आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमाणशी पाणी १३५ लिटरच वापराचा सल्ला, पालकमंत्र्यांचे अादेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर शिल्लक राहिलेले पाणी नाशिककरांना पुरण्यात कुठलीही अडचण येणार नाही, त्यांना आजच्या प्रमाणेच मुबलक पाणी मिळेल, असे स्थानिक लोकप्रतिनिधींपुढे दोन महिन्यांपूर्वीच मांडलेल्या भूमिकेपासून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी साेमवारी घूमजाव केले. पालिकेने प्रतिमाणशी २०० लिटरऐवजी १३५ लिटरच पाणी वापरण्याचा सल्ला देत त्यांनी तेवढेच पाणी पालिकेने देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेशच विश्रामगृहावर झालेल्या बैठकीवेळी अधिकाऱ्यांना दिले.

गंगापूर धरणात नाशिककरांना पुरेल इतके पाणी नसल्याने जायकवाडीस त्यातून पाणी सोडू नये, अशी मागणी स्थानिक आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक एवढेच काय तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आदेश दिल्याने ते सोडावेच लागले, असे सांगत सोडलेल्या पाण्यानंतर धरणात मुबलक पाणी शिल्लक आहे, त्यामुळे नाशिककरांना अडचण येणार नाही, असे अाश्वासित केले होते. मात्र, सोमवारच्या बैठकीत त्यांनी पालिका सत्ताधारी मनसेला लक्ष्य करत पाण्यावरून राजकारण करू नये. सध्या पालिकेत अनेक ठिकाणी प्रतिमाणसी १८० ते २०० लिटर पाणीवापर होतोय. दीड-दोन तास नळ सुरू असतात. त्यामुळे पाणी वापराच्या निकषानुसार प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी वापरण्याचे निकष लावल्यास पाणीटंचाईची आगामी काळात चिंता भासणार नसल्याचे सांगत त्यांनी पाणी कपातीचेच संकेत दिले. शिवाय त्याची अंमलबजावणी नाशिक महापालिकेनेच करावयास हवी. तसे झाले तर उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी देऊ शकू, असेही ते म्हणाले.

ऑडिट योग्यच...
महापालिकेनेपाण्याचे सुरू केलेले सोशल अॉडिट हा उपक्रम अगदी योग्यच आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंब न‌् थेंबाचा हिशेब लागेल. त्याचा फायदा पाण्याचा योग्य वापर होण्यावर होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगत पालिकेच्या या निर्णयाचे कौतुकच केले.