नाशिक: महाराष्ट्र चॅप्टरच्या नाशिक युनिटतर्फे अखिल भारतीय इनोव्हेटिव्ह सेमिनार नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे झाले. आयआरडीए सेबी यांच्या मान्यतेने आयोजित अशा प्रकारचे हे देशातील पहिले सेमिनार ठरले.
मोटार डिपार्टमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट यातील नवनवीन तंत्र कायद्यांची माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित कररण्यात अालेल्या या सेमिनारचे उद्घाटन विभागीय परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष ललित गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. कळसकर यांनी मोटार व्हेईकल कायदा, रोड सेफ्टी ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मार्गदर्शन केले. अभय नागर यांनी फायनान्शियल प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटची माहिती दिली.
आनंद अलकुटकर यांनी इन्शुरन्स पॉलिसी त्यातील बारकावे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल कौन्सिलचे सदस्य नौशाद देसाई, सतीश पवार, विश्वास दामले, अमोल पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारी, खासगी विमा क्षेत्रातील अाॅटोमोबाइल डीलर, त्यांचे प्रतिनिधी यांच्यासह देशभरातील इन्शुरन्स सर्व्हेअर उपस्थित होते.
या उपक्रमाची संकल्पना मांडणारे नाशिक सर्व्हेअरचे अध्यक्ष उमेश सोमाणी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष विलास बोडके यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष रोहित पाटील, खजिनदार योगेश चांडक, विलास बोडके, दीपक कदम, भालचंद्र महाजन, भाऊसाहेब शिरसाठ, विदुल भाबरे, आनंद तांबट, वैभव कुलकर्णी, केशव खैरनार, सुधीर चौधरी, रामदास नरोडे, रोहन तांबट यांनी परिश्रम घेतले.