आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Flood Affected People Help Money Transfer Issue Nashik

प्रशासनाचीच झोळी फाटकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उत्तराखंडमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी एकीकडे दानशूर नाशिककर पुढे येत असले तरी, ती आर्थिक मदत स्वीकारण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नकारघंटा वाजवली जात आहे. मदत करायची असेल तर राष्ट्रीयकृत बॅँकेद्वारे करा, असा सल्ला अधिकारीच देत असल्यामुळे दानशूर मात्र बुचकळ्यात पडले आहेत. याचा अनुभव काही राजकीय पक्षांनी घेतल्यानंतर मात्र या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

उत्तराखंडासाठी राजकीय पक्षांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही मदतीसाठी पुढे आले आहेत; मात्र आर्थिक मदत द्यायची कोठे, असा पेच निर्माण झाला आहे.

फेरीतून जमविले 19 हजार
आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी विविध भागातून काढलेल्या मदत फेरीतून 19 हजार संकलित झाले. ही रक्कम पंतप्रधान निधीत जमा केली गेली. ‘मदत करा, मदत करा’च्या घोषणांसह ओमकार फडके, जगबीरसिंग, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया व सौरभ चव्हाण यांनी ही मदतफेरी काढली होती.

मदतीचे आवाहन
उत्तराखंडमधील भाविकांच्या मदतीसाठी स्टेट बँकेत 11084243321 या खात्याद्वारे मदत करता येईल. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही 32860305777 हा नंबर जाहीर केला आहे. दानशुरांनी थेट संबंधित खात्यांतच मदत द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बँकेत तसा फलक लावण्यात आला आहे.