आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेस्टाइल पद्धतीने ५८ किलो सोन्याची लुट : वाडीवऱ्हे पोलिस घेणार संशयिताचा ताबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाडीवऱ्हे येथील रायगडनगर परिसरात सिनेस्टाइल पद्धतीने ५८ किलो सोने लुटणाऱ्या पाच संशयितांपैकी एका संशयितास ठाणे गुन्हा शोध पथकाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. चार महिन्यांपासून ग्रामीण पोलिस दलाची पथके संशयितांच्या मागावर होती. या संशयिताचा वाडीवऱ्हे पोलिस 1 ऑगस्टला ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोने लूट प्रकरणातील मुख्य सूत्रधार जिशान खान यास ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने नागपाडा (मुंबई) येथे अटक केली. नातेवाइकांना भेटण्यासाठी आला असता पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले. न्यायालयाने ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चार दिवसांनंतर वाडीवऱ्हे पोलिसांना संशयिताचा ताबा मिळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. संशयितांकडून हरिद्वार येथील घरातून दोन कोटी ६० लाखांची दहा किलो सोन्याची बिस्किटे, १२ लाख ५० हजारांची रोकड, १४ लाखांची कार, दीड लाखांचा टीव्ही, देशी कट्टा, पाच जिवंत काडतुसे, ३० लाख रुपये किमतीच्या प्लॉटचे कागदपत्र, नेपाळी चलन असा सुमारे तीन कोटी १८ लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मात्र, अद्याप चार संशयित फरार आहेत. इतर संशयितांच्या अाधारे लवकरच टाेळीतील सदस्यांना पकडण्यात येईल, असा दावा पोलिस निरीक्षक मनोहर पाटील यांनी केला.
..अशी झाली होती घटना
अंधेरीयेथून २४ एप्रिल २०१५ जी गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने शिरपर गोल्ड रिफायनरीमध्ये शुद्धीकरणासाठी सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीच्या गाडीतून (एमएच ०२ सीइ ४०१०) नेण्यात येत हाेते. रायगडनगर परिसरात लोगान कारमधील पाच संशयितांनी पोलिस असल्याचे सांगून चोरी केली होती.
पोलिस रिकाम्या हाती
ग्रामीण पोलिसांनी पाचही संशयितांचे रेखाचित्र प्रसिद्ध केले होते. याआधारे वेगवेगळे गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, भारत-नेपाळ सीमारेषेवर संशयितांच्या शोधासाठी पाठविण्यात आली होती. मात्र, काहीही धागेदोरे हाती लागले नाही.