आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइनग्रेप्सला आता मिळणार संजीवनी, उत्पादकांना करारशेती ठरणार संरक्षित आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारतीय वाइनला दरवर्षी वीस ते तीस टक्क्यांनी मागणी वाढत असल्याने राज्यात वाइनग्रेप्स उत्पादकांना नवी संजीवनी मिळणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात वाइन हब होणार असल्याने वायनरीजना पुन्हा सुगीचे दिवस येत असल्याने शेतकऱ्यांचाही आर्थिक विकास साधणार आहे. राज्यातील वायनरी आणि वाइन ग्रेप्स उत्पादकांमध्ये होणारा करार हा संरक्षित ठरणार आहे.
राज्यात सुमारे चार ते साडेचार हजार एकरावर वाइन ग्रेप्सची लागवड केली जात आहे. नाशिक िजल्ह्यातही माेठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या द्राक्षांची लागवड केली जाते. यामध्ये शिराज, कॅबेरनेट, मेरोट, शेनिंग ब्लाॅक आदी प्रकारच्या जातींची लागवड केली जाते. सध्या या द्राक्षांना प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये तर पिनोनुआर आणि शारदोने या व्हरायटीला ६० ते ६२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना लाभ झाला. गत तीन वर्षापासून वाइनच्या मागणीत वाढ झाल्याने द्राक्षांचीही मागणी वाढली आहे. मात्र क्रशिंगच्या तुलनेत द्राक्ष अपुरे पडत अाहे. वायनरी टेबल ग्रेप्सचीही वाइनसाठी वापर करीत आहे. यावर्षी राज्यात सुमारे ४०० एकरचे वाइन ग्रेप्सचे क्षेत्र वाढले आहे. अनेकांनी वायनरींसोबत करार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

त्याचप्रमाणे वाइन ग्रेप्ससाठी कोणत्याही औषधांची फवारणी किंवा खते द्यावी लागत नसल्याने शेतकऱ्यांचा माेठ्या प्रमाणात खर्चही वाचतो. लहान आणि मोठी वायनरीही आता करारशेती करीत असल्याने पैशांची हमी मिळत असल्याने संरक्षित शेती म्हणून वाइनग्रेप्सकडे पाहिले जात आहे.
वाइनक्षेत्र वाढणार
वाइनग्रेप्सलागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहे. भारतीय वाइनची मागणी वाढल्याने भविष्यात दरवर्षी किमान ३०० ते ४०० एकर वाइनग्रेप्सचे क्षेत्र वाढणार आहे. राजीवसामंत, अध्यक्ष, सुला विनीयार्ड