आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इट्स सीझन ऑफ लव्ह : व्हॅलेंटाइन्स वीकची आजपासून गुलाबी सुरुवात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इट्स सीझन ऑफ लव्ह.. पिंक सीझन... काही अशा भावना असतात, जिथे कोणत्याही बंधनांची तमा नसते. अशा अमर्याद प्रेमाचा सण सुरू होतोय.. गुलाबी वातावरणात, थंडीच्या सरते शेवटी व्हॅलेंटाइन्स वीकची सुरुवात होते. पहिलाच दिवस आज ‘रोज डे’चा...
प्रेमाचे पहिले प्रतिक समजला जाणारा गुलाब या संपूर्ण आठवड्यात खूप महत्त्वाचा असतो. त्याचे रंग प्रेमाचे वेगवेगळे रंग व्यक्त करतात. अर्थात रंग मैत्रीचा, रंग आपुलकीचा, रंग प्रेमाचा आणि आदराचाही.

आपल्या प्रेमाची यापेक्षा चांगली सुरुवात कोणती असावी? यामध्ये फक्त फुलांचीच नाही, तर फुलाच्या विशेष सुगंधाचीही उधळण होणार आहे. आता विशेष सुगंध म्हणजे तो काय.. रोज परफ्युम्समध्ये आजपर्यंत काहीच प्रकार माहीत होते. आज यातही विशेष प्रकार पहायला मिळतील. फक्त हेच नाही, तर ‘रोज कँडल्स’ हाही प्रकार यंदा नवा आहे. तुमच्या व्हॅलेंटाइन्स वीकची सुरुवात लख्ख प्रकाशाने करायची असल्यास सेंटेड रोज कॅन्डल्स बेस्ट पर्याय ठरू शकतील.
यानंतरचा पर्याय सगळ्यांचा आवडता.. इटेबल रोज.. म्हणजे रोज शेपचे केक्स असो किंवा रोज शेप चॉकलेट्स असो, सध्या सगळ्यांना आवडणारा हा एक पर्याय आहे. यातसुद्धा मँगो, स्ट्रॉबेरी, रोज असे फ्लेव्हर्स आहेत. प्रत्येक दिवसाचे वेगळे ग्रिटिंग्ज मिळतील. हा दिवस तरुणांसाठीच आहे असेही नाही. ज्यांना आपल्या लग्नानंतरचा व्हॅलेंटाइन्स वीक साजरा करायचा आहे, त्यांच्यासाठी रोज रिंग केस हा पर्याय दिसून येतो. रोज शेपमध्ये अगदी गुलाबाच्या फुलासारखी दिसणारी एक छोटीशी पेटी, ज्यामध्ये अंगठी ठेवलेली असते. रोज डेची गोड गुलाबी सुगंधी सुरुवात सगळ्यांसाठी तितकीच गोडी घेऊन येवो ही सदिच्छा...
पुढे वाचा गुलाब सुगंधांचे प्रकार...