आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅलेंटाइन शुभेच्छां आडून व्हायरसचा शिरकाव, पीसी, मोबाइल खराब होण्याचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गुलाबी प्रेमाची साक्ष देणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची प्रतीक्षा शिगेला पाेहचली असतानाच या अानंदावर विरजण टाकण्याचे काम काही टेक्नाेसॅव्ही समाजकंटकांनी सुरू केले अाहे. त्यांच्याकडून शुभेच्छापत्राअाडून संगणक वा मोबाइल खराब करणारा व्हायरस पसरवला जात अाहे. त्यामुळे अनाेळखी व्यक्तीकडून "व्हॅलेंटाइन डे'निमित्त शुभेच्छा अाल्यास सावधान राहावे लागेल, असे संकेत अाहेत.
व्हॅलेंटाइन वीक सुरू झाल्यापासूनच तरुणाईमध्ये उत्साह संचारला अाहे. "व्हॅलेंटाइन डे' जल्लाेषात साजरा करण्यासाठी शुभेच्छापत्र, भेटवस्तू अाणि मिठाईचीदेखील खरेदी वेगाने हाेत अाहे. तर काहींनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी इंटरनेटवर "व्हॅलेंटाइन डे'चे शुभेच्छापत्र ‘सर्च’ करायला सुरुवात केली अाहे. अशातच इ-मेलवर एखाद्या अनाेळखी व्यक्तीने शुभेच्छापत्र पाठविल्यास हाती चांगले काही मिळाल्याच्या भावनेतून तातडीने ते शुभेच्छापत्र डाऊनलाेड केले जातात. परंतु या शुभेच्छापत्राच्या माध्यमातून संगणक वा माेबाईल संचात व्हायरसचा प्रवेश हाेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या मार्केटमध्ये असे असंख्य व्हायरस धुमाकूळ घालत अाहेत.
"एसएमएस' व्दारेही धाेका-
केवळइ-मेलच नव्हे तर माेबाईल एसएमएसनेदेखील व्हायरसचा प्रसार हाेऊ शकताे. अशा एसएमएसमध्ये विशिष्ट लिंक दिलेली असते. ती लिंक ज्या सर्व्हरला जाेडलेली असते, त्यात व्हायरसचे भांडार असते. त्यामुळे अगदी सहजपणे हे व्हायरस तुमच्या संगणक अथवा टॅब्लेटमध्ये शिरकाव करुन त्याला धोका पोहोचवतात.
खातरजमा करून घ्या
एखाद्यासंकेतस्थळावरून शुभेच्छापत्र पाठविताना त्याबराेबर कोणताही व्हायरस जाणार किंवा येणशर नसल्याची खातरजमा करून घेणे आवश्‍यक आहे. ‘आय लव्ह यू’ असा संदेश असलेले इ-मेलदेखील ओपन करता तत्काळ डिलीट करावेत. तन्मयदीक्षित, सायबर तज्ज्ञ