आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचा ‘इजहार’; प्रपोझ ऑनलाइनचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- "व्हॅलेंटाइनवीक'मध्ये ‘प्रपोज डे’ला खूप महत्त्व असतं. अर्थात इतर दिवसही तरुणाईकडून अत्यंत नियोजनबद्ध साजरे केले जाताहेत. पूर्वी मुलगा किंवा मुलगी प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर करत असता. मात्र, हेच शब्द आता ऑनलाइन झाले आहेत. डिजिटल कार्ड, व्हॉट्सअॅप, इ-मेल, मेसेज इत्यादींच्या माध्यमातून प्रपोझ करण्याची क्रेझ वाढली आहे. त्यासाठी संकेतस्थळांवर अनेक पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आजची टेक्नोसॅव्ही तरुणाई आता प्रेम व्यक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. यासाठी कुणी स्मार्टफोन अॅपवर वैयक्तिक कार्ड तयार करत आहे, तर कुणी संकेतस्थळ तयार करून त्यावर आपल्या भावना व्यक्त करणार आहे. कुणी मनातील चित्र कॅन्व्हॉसद्वारे चितारणार आहे. तसेच वेडिंग वेबसाइटबरोबरच आता ‘व्हॅलेंटाइन डे’साठीही वेबसाइट डिझाइन केली जात आहे. असे असले तरी काही लोक कागद, पेनचा आजही वापर करतात.
लव्हअॅपचा करणार वापर-
आपलाअधिकाधिक वेळ मोबाइलसोबत घालवणारे तरुण भावना व्यक्त करण्यासाठी याच साधनांचा वापर करत आहेत. तरुणांनी स्मार्ट अॅपवर व्हॅलेंटाइन कार्ड््स बनवले आहेत. या व्हॅलेंटाइनसाठी अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींचा वापर करत कंपन्यांनी काही उत्तम लव्ह अॅप्स लाँच केले आहेत. तसेच काही सर्जनशील लोक लव्ह वेबसाइटही डिझाइन करत आहेत. त्यावर अविस्मरणीय क्षणांचे फोटो, व्हिडिअो अपलोड करून लव्ह मेसेज पाठवता येतात. शेक्सपियरच्या प्रेम कवितांना अॅपच्या माध्यमातून काही तरुण प्रपोझ करत आहेत.

आकर्षक भेटकार्डांनी सजला बाजार हटकेशब्दांचे बाण सोडत तरुणाई भेटकार्डांच्या माध्यमातून ‘प्रपोज डे’ साजरा करणार आहे. यासाठी शहरातील अनेक दुकानांमध्ये हटके ग्रीटिंग्ज आले आहेत. तसेच तरुणांच्या आवडीनुसारही ग्रीटिंग्ज बनवले जात आहेत.
प्रसिद्ध अॅप्स-
क्रिएट ‘व्हॅलेंटाइन्स डे’ कार्ड
फिंगल (लव्ह गेम)
व्हॅलेंटाइन रेडियो (प्रेम कविता)
बी माइन (कार्ड अॅप)
वेबसाइटचे काही पॅटर्न्स-
म्युझिकल वेबसाइट
फोटो वेबसाइट
फोटो प्लस व्हिडिओ
टाइमलाइन वेबसाइट