आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Gupte Talk Weet Divya Marathi Readers In Nashik

‘दिव्य मराठी’च्या वाचकांशी वंदना गुप्ते साधणार संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री वंदना गुप्ते शनिवारी (दि. 16) ‘‘ती’चं आकाश’ या मनमोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमाद्वारे ‘दिव्य मराठी’च्या महिला वाचक आणि ‘मधुरिमा क्लब’च्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.

आपल्या अभिनय कारकीर्दीवर आधारित मनमोकळ्या गप्पांद्वारे संवाद साधताना अभिनय क्षेत्रातील आतापर्यंतचा आपला प्रवास उलगडून विविध प्रकारचे अनुभव त्या महिला वाचकांसोबत ‘शेअर’ करणार आहेत. या वेळी उपस्थित महिला वाचकांना थेट वंदना गुप्ते यांच्याशी प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. उत्तरा मोने सूत्रसंचालनाद्वारे वंदना गुप्ते आणि मैंत्रिणींमध्ये संवादाचा सेतू बांधतील. डॉ. कूर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड येथे दुपारी चार ते सायंकाळी सहादरम्यान ही मनमोकळ्या गप्पांची मैफल रंगणार आहे. या खुमासदार कार्यक्रमासाठी र्मयादित आसनव्यवस्था असून, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी वीस मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.