आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Benefits And Subsidies To Be Deposited In Bank Accounts Irrespective Of Aadhar Card

आधार ऐच्छिक असले तरीही लाभ खात्यातच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची सक्ती न करण्याचे आदेश दिले असले, तरीही विविध योजनांतर्गत देण्यात येणारे लाभ हे बँक खात्यातच जमा केले जाणार आहेत. केवळ, खाते आधारला जोडण्याची सक्ती केली जाणार नसून शासनाकडून येणार्‍या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली. त्यामुळे गॅस व रॉकेलसह अन्य योजनांच्या सबसिडीसाठी ग्राहकांना बँक खात्यांना आधार क्रमांक जोडावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरू राहाणार नोंदणी

न्यायालय आदेशांबाबत लेखी सूचना प्राप्त झालेली नाही. परंतु, केंद्र व राज्य शासनाचे याबाबत मार्गदर्शन मिळताच पुढील धोरण ठरविले जाईल. सक्ती न करता आधार नोंदणी सुरूच राहील.
विलास पाटील, जिल्हाधिकारी