आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारळी पौर्णिमेला लाभणार ‘बंध ऑफर्सचे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात ऑफर्सची अक्षरश: बरसात सुरू झाली आहे. साड्यांपासून गाड्यांच्या दालनापर्यंत हा सण ‘कॅश’ करण्यासाठी कंपन्यांसोबत व्यावसायिकही सज्ज झाले आहेत.

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणार्‍या रक्षाबंधनाला बहिणीला भेट देण्याची प्रथा चालत आली आहे. अलीकडच्या काळात भेट देण्याच्या पध्दतीतही दिवसेंदिवस बदल होतो आहे. भेट म्हणून केवळ साडी, ड्रेस न देता ऑनलाइन गिफ्ट पाठवण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.

इंटरनेटच्या जमान्यात एकीकडे अगदी ‘इ-राखी’ पाठवण्याबरोबरच बॅँकेचे गिफ्ट कार्डस् भेट देण्याची प्रथा रुजू लागली आहे. त्यासाठी बॅँकाही सरसावल्या आहेत. अगदी 500 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत रकमेचे गिफ्ट कार्डही बॅँकांनी बाजारात आणले आहेत. काही बॅँकांनी तर अशा गिफ्ट कार्डपोटी आकारले जाणारे शुल्कही निम्म्यावर आणले आहे. त्यामुळे आपल्याला हव्या तितक्या मूल्याचे कार्ड घेऊन त्यावर अवघे 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. ग्राहकांसाठी 500 ते 50 हजार रुपयांच्या गिफ्ट कार्ड्सचे पर्याय उपलब्ध आहेत. या गिफ्ट कार्डमुळे बहिणीला तिच्या पसंतीचे गिफ्ट खरेदी करता येणे शक्य आहे. याच अनुषंगाने शहरातील नामांकित साड्यांच्या दालनांतून 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते आहे. जॉर्डनपासून कांजीवरम आणि साध्या ड्रेस मटेरिअलपासून ते घागरा ओढणीपर्यंतच्या कपड्यांचा या सेलमध्ये समावेश आहे.

दुचाकी खरेदीवर चांदीचे नाणे
स्कुटी पेप व स्कुटी स्ट्रिक या दोन गाड्यांच्या खरेदीवर 42 ग्रॅमचे चांदीचे नाणे ग्राहकांना भेट देण्यात येत आहे. याशिवाय कमी डाउनपेमेंट आणि कमी व्याजदराचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विजय कुलकर्णी, व्यवस्थापक, मॅजिक टीव्हीएस

साड्यांवर सूट
मागणी असलेल्या साड्यांवर 50 ते 30 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. रक्षाबंधनासाठी ग्राहकांकडून कॅटलॉग प्रिंट, बांबू सिल्क, शिफॉन, जॉर्जेट अशा विविध प्रकारच्या साड्यांना मोठी मागणी आहे. संपत काबरा, संचालक, काबरा एम्पोरियम