आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठी घुमला पोवाडा, अन् लावणीनेही केले मंत्रमुग्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जिवाची होतेय काहिली’ यांसारखे गीत तर ‘ज्यानं इंग्रजांचं बोट चाटलं, त्यानं शिवाजीला चोर म्हटलं, पण ...मऱ्हाठ्याला नाही पटलं’ या शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यापर्यंत भेसळीवर भाष्य करणार्‍या गजाभाऊ बेणी यांची लोकगीते रविवारी गोदाकाठी घुमली.

यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत स्व. व्यंकटराव हिरे स्मृती व्याख्यानपुष्प अ‍ॅड. एकनाथ आव्हाड यांनी गुंफले. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे क्रांतिकारकत्व’ या विषयाला अनुषंगून आव्हाड आणि त्यांच्या कलापथकाने एकापेक्षा एक सरस लोकगीतांचे प्रकार सादर केले. त्यात, भोपी, लावणी, पोवाड्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

छत्रपतीशिवाजी महाराज असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांसारख्या अखंड मानव जातीसाठी कार्य करणार्‍या महामानवांना विशिष्ट समाजाच्या चौकटीत बांधणे चुकीचे आहे. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, त्यांना एका विशिष्ट धर्म, समाजाच्या चौकटीत बसवणे ही संकुचितता असल्याचे अ‍ॅड. आव्हाड यावेळी म्हणाले.

कलापथकांचे योगदान मोठे : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कलापथकांचे योगदान मोठे होते, लोकगीतांचे प्रकार आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, गजाभाऊ बेणी यांसारख्यांनी कुव्यवस्थेवर केलेले प्रहार आणि ोकांची मोट बांधण्यात दिलेले योगदान त्यामुळेच अविस्मरणीय असल्याचे अ‍ॅड. आव्हाड यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

आजचे व्याख्यान
स्व.द. तु. जावभावे स्मृती व्याख्यान
- व्याख्याते :संजयनहार
- विषय :‘सत्ताबदलानंतरचेकाश्मीर’