आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा चित्रपट महोत्सवाचा अाज वाजणार बिगुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकसहभारतातील २० हून अधिक ठिकाणी मंगळवारपासून कि‍र्लाेस्कर वसुंधरा अांतरराष्ट्रीय चित्रपटास प्रारंभ हाेत अाहे. हा चित्रपट महाेत्सव १० जुलैपर्यंत सुरू राहाणार अाहे. किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लघुपट, अनुबोधपट आणि पर्यावरणविषयक अन्य उपक्रमांचा समावेश आहेण्‍

या महोत्सवाचे उद््घाटन िदनांक जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुणे विद्यार्थीगृह महाविद्यालयात ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ या उपक्रमाने होणार आहे. यानंतर सायंकाळी वाजता गंगापूरराेडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे छायाचित्र प्रदर्शनाचे उद््घाटन होणार आहे. इथे पर्यावरणावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री या वेळात सर्वप्रथम ‘कुंभमेळा - ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ ही शॉर्टफिल्म दाखवून महोत्सवाची सुरुवात केली जाईल. नंतर अनुक्रमे वेस्ट सेग्रिरेशन, टेल्स ऑफ टायगर लँड, कवडी - डाईंग रिव्हर, स्टॉप ओपन डेफिकेशन आणि फिश या शॉर्टफिल्म दाखवल्या जातील.

नागरिकांना पर्यावरणविषयक विविध समस्यांविषयी जागरूक करून त्यावर योग्य ते उपाय सुचविण्यासाठी किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवात प्रयत्न केले जातात. या महोत्सवामध्ये सर्व वयोगटासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. जेणेकरून फक्त विद्यार्थीच नाही, तर सर्व क्षेत्रांतील लोकांना यामध्ये सहभागी होता यायला हवे. यानंतर १० तारखेपर्यंत महोत्सवात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कारांचे वितरण
यामहोत्सवामध्ये डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते ‘वसुंधरा मित्र’ हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार अाहेत. यामध्ये संदीप चव्हाण आणि सुप्रिया आगाशे यांना पुरस्कार दिले जातील. तसेच, शेवटच्या दिवशी सुरेश खानापूरकर यांच्या हस्ते डॉ. अजय चांडक यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे.
अशी असेल कार्यक्रमांची रूपरेषा...
८ जुलै : ११.००ते १.३० - झिरो वेस्ट होम - आनंदनिकेतन शाळा. { ६. ३० ते ९.०० - देवराई (लघुपट) - कुसुमाग्रज स्मारक. किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण - कुसुमाग्रज स्मारक.
६.३० ते ९.०० - रिव्हर ऑफ फेथ (लघुपट) - कुसुमाग्रज स्मारक, ऑन लुसिंग ग्राउंड (लघुपट) - कुसुमाग्रज स्मारक.
९जुलै : ६.३०ते ९.०० - सिटी स्लिकर्स (लघुपट), माझे नाशिक, माझी गोदावरी (लघुपट), सीड्स ऑफ फ्रिडम (लघुपट). मिरॅकल इन कोलकाता (लघुपट) - सर्व कुसुमाग्रज स्मारक.
१०जुलै : सकाळीते - कुंभ वॉक.
५.०० ते ६.०० - जंगल बुक बेअर - कुसुमाग्रज स्मारक.
५. ३० ते ८.३० - समारोप - कुसुमाग्रज स्मारक, चिलीका - ज्वेल ऑफ उडीसा (लघुपट), डॉ. अजय चांडक यांना किर्लोस्कर वसुंधरा सन्मान - कुसुमाग्रज स्मारक