आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेवरील भाजीबाजार अाता हटवणारच, हायकाेर्टाचा पालिकेच्या बाजूने निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या निमित्ताने का हाेईना, गाेदावरी प्रदूषित करणारा जुना भाजीबाजार हटविण्याचा मार्ग माेकळा झाला असून, उच्च न्यायालयातही महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यामुळे अाता काेणत्याही क्षणी भाजीबाजारावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई हाेण्याची शक्यता अाहे. परिणामी, गणेशवाडीनजीकच्या मंडईत स्थलांतरित हाेण्याशिवाय भाजीविक्रेत्यांकडे पर्यायच शिल्लक राहिलेला नाही.
गंगेवरील भाजीबाजार हटविण्याचे घाेंगडे २००५ पासून भिजत पडले अाहे. भाजीबाजारातून शिल्लक राहणारा भाजीपाला गाेदावरीत, तसेच किनाऱ्यावर फेकला जात असल्यामुळे दुर्गंधी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण हाेत हाेते. या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी, तसेच अस्वच्छतेचा सामना करावा लागत हाेता. एकप्रकारे स्वच्छ सुंदर नाशिकच्या संकल्पनेलाच हरताळ फासला जात हाेता. यापूर्वी तत्कालीन अायुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून, तसेच बॅरिकेडस टाकून भाजीबाजार हटवला हाेता.

दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजीविक्रेता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या माेहिमेवर सुनावणी सुरू झाली. २०११ मध्ये न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली. दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर त्यावर सुनावणी सुरू हाेती. दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजार हटविणे गरजेची बाब बनली हाेती. या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात दाखल याचिकेवर महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. दरम्यान, गंगामाई भाजीविक्रेता संघाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुभा मागितल्यावर दहा दिवसांकरिता निकाल राखून ठेवला हाेता. दरम्यान, उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावत महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. या वेळी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत याचिकाकर्त्यांनी मुदत मागितली. मात्र, न्यायालयाने त्यासही नकार दिल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक अायुक्त एस. डी. वाडेकर यांनी स्पष्ट केले.