आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vegetable Market On Road Is Headache For Nashik Citizens

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेळसांड: त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमणांकडे प्रशासन यंत्रणेकडून डोळेझाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- त्रिमूर्ती चौकातील वाहतूक कोंडी अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी नुकतीच सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, या ठिकाणच्या अतिक्रमणांकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. रस्त्यावर बसणारा भाजीबाजार हा डोकेदुखी ठरत असून, यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांनी शहरात आतिक्रमण मोहीम राबविताच सिडकोतील अनेक अतिक्रमणधारकांनी स्वत:हून आतिक्रमण काढून घेतले. मात्र, ज्या ठिकाणचे अतिक्रमण काढले, त्या जागेवर वाहने पार्किंग किवा इतर व्यवसाय सुरू करण्यात अाले आहेत. म्हणजे अतिक्रमण काढल्याचा फक्त देखावा आहे. त्यामुळे महापालिकेने यावर कारवाई करण्याची वेळ आली आहे. पाथर्डी फाटा ते उंटवाडी या संपूर्ण रस्त्याच्या कडेला उभे राहणारे हातगाडे, फळविक्रेते यांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भाजी विक्रेत्यांना गाळे, तरीही व्यवसाय रस्त्यावर - त्रिमूर्तीचौकातील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने गाळे दिले आहेत, मात्र बहुतेक विक्रेत्यांनी गाळे भाड्याने दिले आहेत आणि आपला व्यवसाय रस्त्यावर मांडतात. म्हणजे डबल कमाई. मात्र, त्यांच्या बेजाबदारपणामुळे अनेक ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
सायंकाळी रस्ता काढणे कसरत
या भागातून संध्याकाळी वाहने बाहेर काढणे म्हणजे माेठी कसरतच ठरते. या परिसरातील पेठे हायस्कूलच्या त्रिफुलीवर तर दररोज अपघात होत आहेत. रस्ता मोठा झाला, पण त्याचा वापर वाहतुकीसाठी होता भाजी बाजारासाठी होतो आहे.
अतिक्रमण हटविणारे हप्ते घेतात
सिडकोविभागीय कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी अधिकारी हप्ते घेतात. त्यामुळे रस्त्यावरील आतिक्रमण चायनीज गाड्यांचे अतक्रिमण वाढले असल्याचा आरोप नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी प्रभाग सभेत केला. नगरसेवकांनी तक्रारी करूनही अतिक्रमण हटविले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाला आदेश देऊ
- या अतिक्रमणाबाबत आम्ही प्रशासनाला आदेश देऊ. यावर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. नागरिकांनीही अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेऊन सहकार्य करावे.
कांचन पाटील, सभापती, सिडको
प्रशासनाची नागरिकांचीही जबाबदारी
- रस्त्यावरील भाजीबाजार ही विक्रेत्यांची चूकच आहे. मात्र, या ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्याबाबत नागरिकांची मानसिकता बदलायला हवी. हे अतिक्रमण हटविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहेच.
तानाजी जायभावे, नगसेवक