आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिलके, दोडके आणि कारले महागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-भाजीबाजारात सध्या दोडके व गिलके यांच्या दरात वाढ झाली असून, कारल्याचे दर सर्वाधिक वाढल्याने ते ग्राहकांना अधिक कडू लागत आहे. मात्र, इतर पालेभाज्यांची आवक स्थिर असल्याने त्यांचे दर कायम आहेत. कोबी आणि फ्लॉवरची आवक वाढल्याने त्यांच्या दरात घसरण झाली आहे.
जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, इतर शहरांमधून नाशिक शहरात भाजीपाला मोठय़ा प्रमाणात येत असल्याने त्यांच्या दरावर परिणाम झालेला नाही. केवळ कारले 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर, त्या खालोखाल दोडके, गिलके यांच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र, किरकोळ बाजारात कांदा पंधरा रुपये किलोने विक्री होत आहे.