आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाची धडक देत सराफाला लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूरच्या शवाजीनगर परिसरातील दत्तनगरमध्ये सराफी व्यवसाय करणाऱ्यास वाहनाने धडक देऊन त्याच्याकडील एक लाख ९२ हजार रुपये किमतीचे दागिने लुटल्याचा प्रकार शनिवारी रात्री सातपूर आैद्याेगिक वसाहतीत स्नायडर कंपनीजवळ घडला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मनाेहर बाबूराव कुमावत (रा. तपोवन परिसर, पंचवटी) यांचा शिवाजीनगर येथे सराफी व्यवसाय आहे. शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान ते स्कूटीने जात असताना पाठीमागून आलेल्या फाेर्ड आयकाॅन (एमएच १२, बीव्ही ५७८६) या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कुमावत खाली पडताच पाठीमागून मोटारसायकलवरून (एमएच १५, इडी ५८७२)आलेल्यांनी सराफाजवळील बॅग लंपास केली. याचवेळी फाेर्ड आयकाॅनमधील चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील दागिने रोख रक्कम लंपास केली.