आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनधारकांना ‘मार्ग’दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चारमहिन्यांपासून बंद असलेला मायको सर्कल येथील रस्ता नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाने शुक्रवारी सुरू केला आहे. शनिवारी सकाळी हनुमान मंदिराजवळ वाहनधारकांना या रस्त्यावरून जाण्याबाबत नगरसेवकांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते.
वाहतूक कोंडीचे कारण देत वाहतूक पोलिसांनी हा रस्ता बंद केला होता. रस्ता सुरू करण्याच्या वारंवार केलेल्या मागणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. मात्र, गुरुवारी एका महिलेचा बळी गेल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केल्याने हा रस्ता खुला झाला. शनिवारी नगरसेवक तानाजी जायभावे शिवाजी गांगुर्डे यांनी येथे मार्गदर्शन केले. मात्र, रस्ता सुरू झाल्यानंतर नगरसेवक सक्रिय झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, मायको सर्कलची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी होलाराम कॉलनीकडे जाणा-या मार्गाजवळ वाहतूक पोलिसांनी तळ ठोकावा, अशी सूचना बांधकाम व्यावसायिक दीपक मौले यांनी केली.