आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vehicle Parking Issue In District Court In Nashik

नियमांची पायमल्ली - जिल्हा न्यायालयाबाहेर पार्किंग ‘जैसे थे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा न्यायालयाबाहेर मनपाकडून चालवले जाणारे ‘पे अँड पार्क’ अद्याप सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयाच्या भिंतीलगत वाहने लावण्यास सक्त मनाई असतानाही संबंधितांकडून अजूनही वाहने पार्किंग केली जात असल्याने न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

मनपा प्रशासनाकडून काही ठेकेदारांना पोसण्याचे काम सुरू असल्याची टीका होत असल्याने प्रशासनाकडून ही योजनाच बंद करण्यात आली. मात्र, तरीदेखील संबंधितांकडून वाहनांकडून पावती न देता पार्किंग व्यवस्था सुरूच असल्याचे भासविण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशाअन्वये सकाळी ११ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत येथे वाहतूक कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना आहेत. मात्र, वाहतूक शाखेकडून संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याने पार्किंग ‘जैसे थे’ आहे.

आदेशाचे उल्लंघन
जिल्हा न्यायालयाबाहेरचा परिसर हा ‘सायलेन्स झोन’ म्हणून घोषित आहे. येथे अनेक गंभीर गुन्ह्यांचे खटले सुरू असतात. कायदा व सुव्यवस्थेसह सुरक्षेचादेखील प्रश्न निर्माण होतो. याकरिता न्यायालयीन परिसरात ‘नो पार्किंग झोन’ असल्याने शासनाने कायदा केला. मात्र, याचे सर्रास उल्लंघन होत आहे.

सर्वच नियमाबाह्य जिल्हा न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुरू असलेली पार्किंग सुविधा नियमाबाह्य ठरवण्यात आली आहे. मात्र, आर्थिक संबंध आणि कार्यकर्ते सांभाळण्याकरिता सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयीन नियम डावलून ठेके देण्यात येतात.