आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या दुचाकी दोन हजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहर व परिसरात दुचाकी चोरून ग्रामीण भागात त्या अल्प किंमतीत विकणारी टोळी सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केली. संशयितांकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 18 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. काही दुचाकी तर अवघ्या दोन ते पाच हजारांना विकण्यात आल्या. संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस उपआयुक्त साहेबराव पाटील, सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शरणपूररोडवरील सुयोजित मॉडर्न इमारतीतून संशयित एक दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने चोरण्याचा प्रयत्नात असताना दुचाकीमालक किसन शिंदे (रा. सातपूर) यांनी आरडाओरड केली. उपनिरीक्षक शेषराव उदार व त्यांच्या पथकाने संशयितांना पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव समाधान शांताराम शिरसाठ (रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडून कुणाल नंदलाल जगताप व कळवण येथे एजंटचे काम करणारा संजय मधुकर देवघरे यांची नावे उघड झाली. तिघांनाही अटक केली असून त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसात दाखल दहा आणि अंबड व भद्रकाली ठाण्यातील आठ गुन्हे उघडकीस आले.