आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभनगरीत रस्ताेरस्ती भरताेय वाहनांचा मेळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विकसितहाेणाऱ्या शहरांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या नाशिकमध्ये पुरेशी पार्किंगची व्यवस्थाच विकासाच्या प्रक्रियेत माेठी बाधा निर्माण हाेत अाहे. शहरात इमारतींची संख्या वाढत असली तरी त्यांना पार्किंगसाठी पुरेशी जागाच साेडली जात नाही. बहुसंख्य व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेचा उपयाेग व्यावसायिक कामासाठीच केला जाताे. त्यामुळे वाहने रस्त्यावर ठाण मांडतात अाणि वाहतुकीचा वारंवार खाेळंबा हाेत राहताे.
अाज शहराची लाेकसंख्या सुमारे १८ लाखांच्या घरात असून, वाहने १२ लाख ३३ हजार अाहेत. म्हणजे लाेकसंख्येच्या तब्बल ६६ टक्के वाहने शहरात अाहेत. ही वाहने पार्क करण्यासाठी नगररचना अधिनियमानुसार पुरेशी पार्किंगची व्यवस्था असणे क्रमप्राप्त ठरते. परंतु, प्रत्यक्षात ती अत्यंत ताेकडी अाहे. जुन्या इमारतींची व्यवस्था तर खूपच तुटपुंजी अाहे. महापालिकेच्या दप्तरी ४० ते ६० वर्षांच्या ४६ हजार ९४७ इमारती आहेत. तर, १५ ते ४० वर्षे जुन्या इमारतींची संख्या लाख इतकी आहे. म्हणजे सुमारे दीड लाख इमारतींची पार्किंग केवळ नावालाच अाहे. इमारत बांधतानाच पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे असते. तसा नकाशा नगररचना विभागाकडून मंजूर करून घ्यावा लागताे. मात्र, प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्था केवळ कागदावरच करून त्या जागा व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याकडे संबंधितांचा कल असताे. त्यामुळे या इमारतींमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे रस्ते अरुंद हाेतात. वाहतूक काेंडीबराेबरच प्रदूषणातही वाढ हाेते.

कुंभमेळ्याच्या, विशेषत: पर्वणी काळात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने गच्च भरणार अाहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच रस्ते माेकळे करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची अाहे. कुंभमेळ्याला तसा विधिवत प्रारंभ झालेला असतानाही महापालिका प्रशासनाने पार्किंगच्या जागांमध्ये अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात अाहे.

शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांचा माेठा भाग अनधिकृत पार्किंगमुळे व्यापला गेलेला दिसताेे. काही ठिकाणी तर चक्क अर्धा रस्ता वाहनांनी काबीज केलेला दिसताे. मात्र, त्याचे कुठलेही साेयरेसुतक संबंधित व्यावसायिकांना नसते. किंबहुना, अनेक ठिकाणी संबंधित व्यावसायिकांचे सुरक्षारक्षकच रस्त्यावरील वाहने थांबवून अनधिकृत वाहनांना वाट माेकळी करून देताना दिसतात. हा शिरजाेरपणा नाशिककरही मुकाटपणे सहन करीत असल्याने व्यावसायिकांचे चांगलेच फावत अाहे. क्रमश:
प्रमुख रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांचे असे अतिक्रमण हाेत असल्याने अन्य वाहनांना अंग चाेरून मार्ग काढावा लागत अाहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर अधिकाधिक माेकळे हाेणे अपेक्षित असताना काही व्यावसायिकांनी अतिक्रमण अस्ताव्यस्त वाढवून रस्ता रुंदीकरणाच्या उद्देशालाच छेद दिला अाहे. पार्किंगच्या जागेतच बांधकाम करून ग्राहकांना वाहने रस्त्यात उभी करण्यास भाग पाडले जात अाहे. व्यवसायवृद्धीसाठी सार्वजनिक जागा पार्किंगसाठी बहाल करण्याच्या या प्रकारावर ‘दिव्य मराठी’ने वारंवार अावाज उठविला अाहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या समस्येवर प्रकाशझाेत. नाशिकच्या रस्त्यांवर दिवसा रात्रीच्या वेळी नाेंदविलेली निरीक्षणे मांडणारी ही मालिका अाजपासून...
बातम्या आणखी आहेत...