आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधित एफसीआयच्या परिसरात वाहनांचा मेळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या कार्यालयासमोर ट्रक भरलेल्या धान्याच्या पोत्याऐवजी गुरुवारी नव्या मोटारी, ट्रॅक्टर्स, स्कूटर्सचा बाजार भरल्याचे दृश्य पाहून तेथील कर्मचारी, अधिका-यांनी आपल्या कामाच्या वेळात एकच गर्दी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या हा वाहनमेळा एफसीआय आवारात अचानक कसा भरला, याबाबत उलटसुलट चर्चेने महामंडळाच्या १० एकर क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले.

ह्युंडाई कंपनीच्या मोटारी, सोनालिकाचे ट्रॅक्टर्स, हीरो होंडाची दुचाकी वाहने आदींनी सकाळपासूनच एफसीआयचे आगार गजबजून गेले होते. सकाळी कामावर जाण्याऐवजी कर्मचारी या ठिकाणी घुटमळू लागले. तेथील अधिकारीही कर्मचा-यांना बोलावून माहिती देऊ लागले.
खासगी कंपन्या एचडीएफसीसारख्या खासगी बँकांच्या स्टॉलचा एफसीआय परिसरात खुलेआम शिरकाव झाल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. याबाबत चौकशी केली असता, एचडीएफसी बँकेने विविध वाहन कंपन्यांना सोबत घेऊन एफसीआयच्या आवारातच लोन मेळा वाहनविक्री प्रदर्शन भरविले होते, अशी माहिती मिळाली. यामुळे अनेक अधिकारी कर्मचारी अचंबित झाले. परिसरात दिवसभर या प्रकाराची कुजबूज सुरू होती.

प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या या साठवणूक प्रकल्पात प्रवेश घेणा-या प्रत्येकाला आतमध्ये येण्याचे कारण, कोणाकडे काय काम आहे, ते मोबाइल क्रमांक देऊन प्रवेशद्वारावर नोंदवावे लागते. या ठिकाणी महामंडळ कर्मचा-याखेरीज कुणालाही प्रवेश दिला जात नाही. अतिरेक्यांपासून सुरक्षितता म्हणून हाय अलर्टच्यावेळी या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते.

हजारो क्विंटल पोती, गहू, तांदूळ यासह धान्य तेथील गुदामात रेल्वेतून भरवून साठवणूक केली जाते. जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर रेशन दुकांनामध्ये पुरवठा अधिका-यांच्या नियंत्रणाखाली ट्रकमधून ठिकठिकाणी धान्य वितरित केले जाते. मात्र, अशा ठिकाणी खासगी एजंटांचा वाहनमेळा खासगी बँकांचा मेळा भरविण्यासाठी कशी परवानगी दिली जाते, तेथील सुरक्षा व्यवस्थेचे काय, प्रवेशद्वाराबाहेर हा मेळा का नाही भरला आदी प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्याचे उत्तर संबंधितांकडून मिळणे गरजेचे आहे.

कंपनीने पाठविले
सोनालिका कंपनीने ट्रॅक्टरची माहिती विक्रीसाठी प्रतिनिधी म्हणून आपल्याला एफआयसीमध्ये नवीन वाहनांसह पाठविले. विशालआव्हाड, कर्मचारी, सोनालिका ट्रॅक्टर

आमच्या बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती कर्मचा-यांना देण्यासाठी हा लोन मेळा घेतला. अनिलपटाईट, सेल्स मॅनेजर, एचडीएफसी बँक, मनमाड

परवानगी घेतली
एचडीएफसीबँकेने लोन मेळावा भरविण्यासाठी परवानगी मागितली होती, ती आम्ही दिली आहे. चंद्रेशबाबूराव ठाकरे, एरिया मॅनेजर, एफसीआय, मनमाड

चर्चेला उधाण
एफसीआयच्या येथील एरिया मॅनेजरांच्या कार्यालयासमोरच चक्क ट्रॅक्टर, गाड्यांचा लोन मेळा भरल्याने यात नेमका कोणाचा इंटरेस्ट होता, याबाबत कर्मचा-यांसह अधिका-यांत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
^ह्युंदाईच्या आय २० गाड्यांसह इतर गाड्यांची लोनची माहिती आपण एफसीआय कर्मचा-यांना प्रत्यक्ष गाडी दाखवून देत आहोत. तुषारजगताप, सेल्स ऑफिसर, ह्युंदाई
बातम्या आणखी आहेत...