आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूर परिसरात समाजकंटकांनी पुन्हा फाेडल्या कारच्या काचा, नागरिकांमध्ये संताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - सद‌्गुरूनगरमधील डॉ. अमोल वाजे यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा गुरुवारी (दि. १९) पहाटे फोडल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. डॉ. वाजे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्विफ्ट डिजायर कारची (एम. एच. ४१ एएम ८०२) मागील पुढील काच पहाटे सव्वातीन ते साडेतीनच्या दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पेव्हर ब्लॉक फेकून फोडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याबाबत डॉ. वाजे यांनी सातपूर पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे. 
 
पोलिसांनी या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.२७ जुलैला कामगारनगरमधील अाठ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या सातपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच महिन्यात डॉ. भामरे यांच्या गाडीचीही काच फोडण्यात आली होती. त्याअाधी गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला सातपूर कॉलनीत अज्ञात समाजकंटकांनी १० वाहनांच्या काचा फोडल्या हाेत्या. त्या घटनांमधील आरोपी अजून मोकाट अाहेत. अाता लक्ष्मीपूजनाच्या पहाटे पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप अाहे. 
बातम्या आणखी आहेत...