आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त शुल्कप्रकरणी कॉलेजांची पडताळणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अतिरिक्तशुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांची बुधवारपासून माध्यमिक शिक्षण विभाग पडताळणी करणार आहे. पडताळणीदरम्यान दोषी आढळणाऱ्या महाविद्यालयांचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

अकरावी बारावी प्रवेशप्रक्रियेदरम्यान बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या निषेधार्थ छात्रभारती संघटनेने शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना घेराव घालत अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर जागे झालेल्या माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी-बारावी प्रवेशप्रक्रिया पडताळणीसाठी समिती स्थापन केली. या पडताळणी समितीचे कामकाज बुधवारपासून सुरू होत आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाचे धोरण असतानाही मुलींकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचा रोष छात्रभारतीने मोर्चाद्वारे व्यक्त केला होता. छात्रभारतीच्या या दणक्यानंतर जाग आली. समितीचे कामकाज ११ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

यामहाविद्यालयांची होणार पडताळणी : बुधवारपासूनसुरू होणाऱ्या शिक्षण विभागाच्या पडताळणी मोहिमेत व्ही. एन. नाईक, भोंसला, पंचवटी महाविद्यालय, के. के. वाघ. सरस्वतीनगर आणि पुरिया पार्क, के.टी.एच.एम., बी.वाय.के., आरवायके, बिटको, एस.एम.आर.के., जी. डी. सावंत, डी. डी. बिटको, वाय. डी. बिटको, जनता विद्यालय, शिवाजी विद्यालय या महाविद्यालयांची पडताळणी केली जाणार आहे.

या अधिकाऱ्यांचा समावेश
अतिरिक्तशुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांची पडताळणी करण्यासाठी समिती तयार केली आहे. त्यात उपशिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक, राजीव म्हसकर सुनीता म्हैसकर यांचा समावेश आहे.