आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदलाचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र राज्यात सत्ता गमवाव्या लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसह स्थानिक पातळीवरील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांमध्ये अालेली मरगळ दूर करून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी फेरबदल करण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून देण्यात अाले अाहेत. यात नाशिक जिल्हाध्यक्ष अाणि शहराध्यक्षपदावर अाठवडाभरात नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अाहे.

काँग्रेसमध्ये राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत तरुण पिढीला नेतृत्वाच्या संधी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या अाहेत.निवडणुकांच्या निकालानंतरच प्रदेशाध्यक्षांसह प्रभारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात येणार हाेत्या. त्यासाठी संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रियादेखील सुरू झाली. मात्र, केवळ प्रदेशस्तरावरच बदल करण्यात अाले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी खासदार माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात अाली. त्यापाठाेपाठ प्रदेशस्तरावरच्या निवडणुकांएेवजी थेट नियुक्त्या जाहीर करण्यात अाल्या. परंतु, जिल्हाध्यक्ष अाणि शहराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तूर्त स्थगित करून त्यावरील पदाधिकारी कायम ठेवण्यात अाले हाेते. दरम्यान, काही महिन्यांमध्ये पक्षात स्थानिक पातळीवर निरुत्साह बघता संघटनात्मक बांधणीकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याचे ठरविल्याचे दिसून येत अाहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत भेटी घेत फेरबदलाची तयारी सुरू केली अाहे. याच स्तरावर नाशिक जिल्हाध्यक्ष अाणि प्रभारी शहराध्यक्षांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही दुजाेरा दिला असून, अनेकांची नावे चर्चेत अाली अाहेत.

निष्ठावंत,इच्छुकांची माेर्चे बांधणी : वर्षभरापासूनशहराध्यक्षपदी प्रभारी असलेले शरद अाहेर यांची नियुक्ती पुढील काळासाठी कायम ठेवली जाण्याची शक्यता अाहे. मात्र, या पदासाठी पुन्हा एकदा माजी शहराध्यक्ष अाकाश छाजेड, गटनेते शाहू खैरे, डाॅ. हेमलता पाटील, माजी मंत्री डाॅ. शाेभा बच्छाव, डाॅ. दिनेश बच्छाव यांचीही नावे स्पर्धेत असल्याचे बाेलले जात अाहे. ज्या पद्धतीने ‘छाजेड हटाव’साठी पक्षांतर्गत विराेधकांनी माेट बांधली होती, त्याचप्रमाणे काही इच्छुकांनी शहराध्यक्षपदासाठी, तर जिल्हाध्यक्षपदासाठी रमेश कहांडळ, सकाळे यांच्या नावाची जाेरदार चर्चा सुरू अाहे. पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली असून, शेवटच्या क्षणी काेणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत खल सुरू अाहे.

१५ वर्षांनंतर नवा जिल्हाध्यक्ष
विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांनी चार महिन्यांपूर्वीच अापण दाेन टर्मपेक्षा जास्त काळ तब्बल १५ वर्षांपासून या पदावर असल्याने नवीन नियुक्तीची मागणी केली होती. या पदासाठी संपत सकाळे, प्रसाद हिरे, डाॅ. तुषार शेवाळे, अनिल अाहेर, सुनील अाव्हाड, रमेश कहांडाेळे, यशवंत पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड यांची नावे चर्चेत अाली अाहेत.