आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबसाठी लवकरच निविदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकच्या इलेक्ट्रिक अाणि इलेक्ट्रीकल उद्याेगच नाही तर नाशिक शिलापूरच्या परिसरासाठी वरदान ठरू शकणाऱ्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या बांधकामाचा श्रीगणेशा लवकरच हाेणार अाहे. प्रकल्पाकरीता पहिल्या टप्प्यात शंभर काेटी रुपये मंजूर असून प्रथमत: अत्यावश्यक असलेल्या संरक्षण भिंतीच्या अनुषंगाने लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून पुढील तीन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यापूर्वीच सीटीअारअायने स्पष्ट केलेले अाहे.

नाशिक हे इलेक्ट्रिक अाणि इलेक्ट्रीकल उद्याेगांचे हब म्हणून देशाच्या नकाशावर प्रसिद्ध अाहे. देशातील एेंशी टक्के स्विच गियर्स अाणि ब्रेकर्सचे उत्पादन एकट्या नाशिकमध्ये हाेते, असे सांगितले जाते. मात्र, येथील उद्याेगांना अापली उत्पादने तपासणीसाठी बंगलाेर, भाेपाळ येथे पाठवावी लागतात. हे काम वेळखाऊ अाणि खर्चिक अाहे. त्यामुळे ही उत्पादने तपासणारी मानांकन देणारी लॅब (तपासणी प्रयाेगशाळा) नाशिकमध्ये व्हावी याकरीता सातत्याने उद्याेजकांकडून मागणी केली जात हाेती.

नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या व्यासपीठावरून ‘निमा पाॅवर’ प्रदर्शनातून अशा लॅबची मागणी प्रामुख्याने मांडली गेली. यानंतर केंद्र सरकारकडे स्थानिक लाेकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने तिला मान्यता मिळाली. नाशिक-अाैरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर गावठाणाची शंभर एकर जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात अाल्याचे सांगण्यात येते. एचएएल, सिक्युरिटी प्रेस यानंतर प्रदीर्घ काळानंतर केंद्र सरकारचा येणारा हा प्रकल्प असल्याने त्याचा नाशिकच्या उद्याेगांसाठी जसा लाभदायी ठरणार अाहे, तसाच ताे परिसराचा चेहरा माेहरा बदलण्यास सक्षम ठरू शकणार अाहे. हजाराे तरुणांना यात प्रत्यक्ष तर तितक्याच लाेकांना अप्रत्यक्षपणे राेजगारही उपलब्ध हाेऊ शकणार अाहे.

पहिल्या टप्प्यात शंभर काेटी रुपये मंजूर
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीकरीताची निविदा लवकरच निघेल काम सुरू हाेऊ शकेल. पहिल्या टप्प्यात शंभर काेटी रुपये मंजूर असून हा प्रकल्प उद्याेगांसह परिसरातील नागरिकांनाही प्रचंड लाभदायी ठरणार अाहे. - हेमंत गाेडसे, खासदार
बातम्या आणखी आहेत...