नाशिक - मनसेचे माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले (वय ७६) यांचे मंगळवारी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आजवर त्यांनी नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वार्धक्याचे कारण देत राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले होते. त्यानंतरही मनसेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मातब्बरांना तोंड देत ढिकले यांनी स्वत:चे पॅनल करण्यासाठी सुरुवात केली होती. अशातच रविवारपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येेऊन ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता पंचवटी येथील अमरधाम येथे ढकले यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.