आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • VHP Start Helpline For Child Less Hindu Couple Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी हेल्पलाइन सुरु करणार - तोगडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी जाहिर झालेली जनगणना आकडेवारीचे दाखले देऊन ते म्हणाले, 'हिंदूची संख्या वाढवण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. ज्या हिंदूंच्या घरात अपत्य नाहीत त्यांच्यासाठी लवकरच हेल्पलाइल सुरु केली जाईल.' नाशिकमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात व्हीएचपीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
तोगडिया म्हणाले, 'ज्या हिंदू कुटुंबात संतान प्राप्ती झालेली नाही त्यांच्यावर उपचार केले जातील आणि त्यांना चार मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.' जनगणना आकडेवारीचा हवाला देऊन तोगडिया म्हणाले, हिंदूंची संख्या 80 टक्क्यांनी कमी होणे चिंतादायक बाब आहे.

10 ठराव मंजूर
नाशिकमधील व्हीएचपीच्या संमेलनात 10 ठराव मंजूर करण्यात आले. त्यात धर्मांतर रोखणे. घरवापसी कार्यक्रम सुरु ठेवणे. समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करणे. तीन कोटी बांगलादेशींना त्यांच्या देशात पाठवणे. लव्ह जिहादला पायबंद घालणे आणि मंठ, मंदिरात गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे. बेरोजगार हिंदू तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे. गर्भात होणारी मुलींची हत्या रोखणे.