आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Dr. Arun Jamakara, Latest News In Divya Marathi

करिअर हवे इनोव्हेटिव्ह अन् क्रिएटिव्ह - कुलगुरू डॉ. अरुण जामकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील करिअरकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, या फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले.‘दिव्य मराठी’ आणि महेश ट्युटोरिअल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्य एज्युकेशन अ‍ॅण्ड करिअर फेअर’ या उपक्रमाचे सिटी सेंटर मॉलमध्ये आयोजन केले आहे. या तीनदिवसीय उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जामकर बोलत होते. आज स्पर्धेच्या युगात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी विद्यार्थ्यांना योग्य माहितीअभावी आवडीच्या क्षेत्रात करिअर करता येत नाही. पालकांच्या इच्छेनुसार बहुतांश विद्यार्थी करिअरचा पर्याय निवडतात. परंतु, त्यातून नवनिर्मितीचे कौशल्य हाती येत नसल्याने शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचितच राहावे लागते. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविला जात आहे. यात विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी असंख्य प्रकारच्या करिअरच्या संधी शोधता येणार आहेत.
या वेळी ‘दिव्य मराठी’ नाशिकचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी, महेश ट्युटोरियल्सचे नीलेश सौदागर, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे विजय कुलकर्णी, स्टेट बँक फ हैदराबादचे अशोक कुलकर्णी, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे हर्षवर्धन गुणे, के. एस. पाटील, अशोका महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेलरांधे, आयएनआयएफडीचे सुरजितसिंग मनचंदा, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे आदींसह मान्यवर व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतला उपक्रमात सहभाग
‘करिअर फेअर 2014’मध्ये शहरातील तीसहून अधिक नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, फॅशन डिझाइन, टेक्निकल कोर्सेस, एज्युकेशन लोनविषयी माहिती असलेल्या स्टॉल्सचा यात समावेश आहे. त्यात महेश ट्युटोरियल्स, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, मविप्र संस्था, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, अशोका एज्युकेशन फाउंडेशन, के. व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निक कॉलेज, मातोश्री एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यार्थीगृह, किशोर सूर्यवंशी कॉलेज, जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसीए, रिलायबल अकॅडमी, आयएनआयएफडी, डिझाइन टेक-टेक्नॉलॉजी फॉर डिझाइन, महावीर पॉलिटेक्निक, महात्मा गांधी विद्यामंदिर, नील काबराज् अकॅडमी, फॉरेश अकॅडमी, मातुश्री आयआयटी फाउंडेशन, जीनिअस ग्रुप, सायन्स अकॅडमी, सिलिकॉन व्हॅली, सीजीएफसी, असेंट लर्निंग अकॅडमी, आयआयटी स्पेक्ट्रम अकॅडमी, इंडियन इन्स्टिट्यूट फ इन्व्हेस्टिगेशन, स्टेट बँक ऑफ हैदराबाद व आयआयटी अकॅडमी यांचा सहभाग आहे.