आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंक्य चुंभळे याच्या अटकपूर्ववर आज सुनावणी, बलात्कार गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घटस्फाेटीत तरुणीला लग्नाचे अामिष दाखवून बलात्कार गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवकपुत्र अजिंक्य चुंभळे याच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत बुधवारी(दि. २३) संपत असून, त्यावर अंतिम निर्णय हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, संशयित अजिंक्य यास न्यायालयाने दरराेज इंदिरानगर पाेलिस ठाण्यात हजेरीचे अादेश दिले असता त्याने त्याचे उल्लंघन केल्याने या प्रकरणात गर्भपात करणाऱ्या डाॅ. उमेश मराठे यास अटक केल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.

नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचा पुत्र अजिंक्य याच्याविराेधात इंदिरानगर पाेलिस ठाण्यात दाखल बलात्कार गर्भपाताच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने पाच दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला अाहे. या जामिनाची मुदत बुधवारी (दि. २३) पूर्ण हाेत असल्याने त्यावर अंतिम सुनावणी हाेणार अाहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, संशयित अजिंक्य याने तिला लग्नाचे अामिष दाखवित नाशिकसह वेगवेगळ्या शहरात पंचतारांकित हाॅटेल्समध्ये बलात्कार केल्याचा अाराेप केला अाहे. त्याचबराेबर जबरदस्तीने सिडकाेतील लेखानगरच्या लाइफ केअर हाॅस्पिटलमध्ये नाव बदलून गर्भपात केल्याचेही तक्रारीत म्हटले अाहे. फिर्यादीनुसार पाेलिसांनी गर्भपात करणाऱ्या डाॅ. मराठे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, अजिंक्यने गुन्हा दाखल हाेताच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर चुंभळेंच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद करीत हे षडयंत्र असल्याचे युवतीबराेबरच त्याचे प्रेमसबंध असल्याने बलात्कार नसल्याचा दावा केला हाेता. त्याचबराेबर अजिंक्यचा २५ नाेव्हेंबरला विवाह असल्याचे कारण पुढे करीत अंतरिम जामिनाची मागणी केली हेती, तर पाेलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य स्पष्ट करत जामिनास कडाडून विराेध केला हाेता. मात्र, हा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने संशयित चुंभळेला तात्पुरता दिलासा दिला. यावर तपासी पथकाने सखाेल तपास करीत अजिंक्य याच्याविराेधात सबळ पुरावे जमा केले अाहेत. तर त्याला साथ देणाऱ्या डाॅक्टरला अटक केल्याने या दाेघांची चाैकशी अाणखी काही साथीदार सहभागी असल्याचा संशय व्यक्त करीत जामीनास विराेध केला जाण्याची शक्यता अाहे.

लग्न समारंभावर अटकेचे सावट : संशयितअजिंक्य याचा २५ नाेव्हेबरला विवाह हाेत अाहे. काेर्टाने त्याचा जामीन रद्द केल्यास लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच ताे पाेलिसांच्या बेडीत अडकण्याचे सावट निर्माण झाले अाहे. दरम्यान, याच प्रकरणात अटकेत असलेल्या डाॅ. मराठे यांचीही पाेलिस काेठडी बुधवारी संपत असून त्याबाबतही काेर्टात निर्ण हाेणार अाहे.

न्यायालय अादेशाचे उल्लंघन, सरकारी वकिलांची कसाेटी
अजिंक्ययास न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर करताना दरराेज पाेलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, अजिंक्यने दाेनच दिवस हजेरी लावली. उर्वरित दाेन दिवस ताे फिरकला नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. काेर्टाच्या अादेशाचे त्याने उल्लंघन केल्याने या प्रकरणात पाेलिसांकडे महत्त्वाचे धाेगेदाेर हाती लागल्याने त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकार पक्षातर्फे केली जाणार अाहे. यात, विशेष सरकारी काही महिन्यांपूर्वीच जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झालेल्या अजय मिसर यांची कसाेटी लागणार असल्याची चर्चा काेर्ट वर्तुळात अाहे.
बातम्या आणखी आहेत...