आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविप्र'त पुन्हा 'प्रगती'; नीलिमा पवार यांचा निसटता विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत निफाड आणि कसमा तालुक्यातील मतांच्या जोरावर प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन केला. संपूर्ण निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या नीलिमा पवार यांना विजयासाठी माेठा संघर्ष करावा लागला. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत त्यांनी अवघ्या १४३ मतांनी आघाडी घेत अॅड. नितीन ठाकरे यांच्यावर निसटता विजय मिळवला. विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांचा करिश्मा 'कसमादे'त फारसा चालल्याने समाजविकास पॅनलचा धुव्वा उडाला. 

आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक हेवेदावे यांनी गाजलेल्या या निवडणुकीत नातेसंबंध हा घटकही महत्त्वपूर्ण ठरला. सोमवारी (दि. १४) सकाळी वाजेपासून केटीएचएम प्रांगणातील जिमखाना सभागृहात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यापासून प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. संपूर्ण निवडणूक अध्यक्ष अाणि सरचिटणीस या पदांभाेवती फिरत हाेती. प्रगती पॅनलची संपूर्ण भिस्त निफाडवर हाेती. तर समाजविकास पॅनलचा जाेर कसमादेवर हाेता. प्रत्यक्षात प्रगती पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार डाॅ. तुषार शेवाळे यांनी कसमादेत अापल्या नातेसंबंधांचा अाणि काैशल्याचा पुरेपूर वापर करून घेत प्रतापदादांचा प्रभाव कमी केला. शिवाय त्यांनी संपूर्ण पॅनललादेखील बळ दिले. दुसरीकडे प्रगती पॅनलच्या सर्वेसर्वा नीलिमा पवार यांना स्वत:ला मात्र विजयासाठी माेठी मेहनत घ्यावी लागली. 

व्हीलचेअरवरून अाल्याचाही अानंद
संस्थेचे बहुतांश सभासद ७० ते ८० पेक्षा अधिक वयाचे झाले असल्याचा मुद्दा चर्चेत अाला. त्यामुळे काही सभासद मतदानासाठी व्हीलचेअरवरून अाल्याची बरीच चर्चा झाली. मात्र, त्यामुळे सभासदांना त्यांचे महत्त्व समजत असून तसे येण्यातही त्यांना अभिमान वाटताे. त्यामुळे व्हीलचेअरवरून येण्यातदेखील त्या सभासदांना अानंद असल्याचे सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले.
 
अखेर उपवास सोडला 
अनेकांचाश्रावणी सोमवारचा उपवास होता. मात्र, उपवासाच्या पदार्थांची व्यवस्था नसल्याने अनेकांनी वडापाव खाऊन उपवास सोडला. काहींनी सर्वसाधारण सभेत मिळालेला चिवडा खाऊन भूक भागवली. 

व्यावसायिकांची चंगळ 
सकाळीवाजेपासूनच केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सभासद आणि दोन्ही पॅनलच्या सदस्यांची गर्दी झाली होती. मतपत्रिका विभागणीचे काम तब्बल तास चालल्याने समर्थकांची एकाच चालबिचल सुरू झाली. या काळात परिसरातील चहाच्या टपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची जोरदार विक्री झाली.
 
अंदाजपंचे दाहोसे 
सकाळपासूनचउमेदवार मतमोजणी केंद्रावर आले होते. मतपत्रिका विभाजनावेळी निवडणुकीचे साधारणतः काय चित्र आहे याचा अंदाज प्रत्येकजण आपापल्या परीने काढत होता. 'अंदाज पंचे दहोसे'चा खेळ बराचवेळ चालू होता. 
 
पवार यांचा नैतिक पराभव 
चिटणीसपदाचाउमेदवार१२०० ची अाघाडी घेताे अाणि प्रगतीच्या सर्वेसर्वा नीलिमा पवार या केवळ १४३ मतांनी विजयी हाेतात ही बाब त्यांना अात्मपरीक्षण करायला लावणारी अाहे. नीलिमा पवार यांचा हा नैतिक पराभव अाहे. माझे मतदान बघता मी अन्य काेणत्याही जागेवर निवडू शकलाे असताे. परंतु, मी वैयक्तिक स्वार्थी भूमिका घेतली नाही. 
-अॅड. नितीन ठाकरे, पराभूत उमेदवार 

पॅनलच्या समूहभावनेचा विजय 
प्रगती पॅनलमधील समूह भावनेचा हा विजय अाहे. त्यामुळे अामचा एकाही जागेवर पराभव झाला नाही. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची मतदारांनी दिलेली ही पावती अाहे. केवळ विराेधाला विराेध करणाऱ्यांना सभासदांनी जागा दाखवून दिली अाहे.
-नीलिमा पवार, विजयी उमेदवार 
बातम्या आणखी आहेत...