आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhan Parishad Election Vote Counting Investigation Nashik

विधान परिषद अवैध मतांची आज होणार तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषद निवडणुकीदरम्यान आमदार जयवंत जाधव व प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या अवैध मतांची गुरुवारी (दि. 10) उच्च न्यायालयात तपासणी होणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पक्षपातीपणे मते बाद केल्यामुळेच पराभव झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर सहाणे यांच्यासाठी तपासणी आशादायी ठरणार आहे.

जाधव व सहाणे यांना समसमान मते पडल्यामुळे निकालाच्या वेळी पेच निर्माण झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी चिठ्ठी पद्धतीने फैसला केला. यात जाधव यांना कौल मिळाला होता. दरम्यान, चिठ्ठी पद्धतीचा निर्णय घेण्यापूर्वी 23 बाद मतांची तपासणी करण्यावरून बराच खल झाला. त्यात 12 मतपत्रिका कोर्‍या होत्या, तर 11 मतपत्रिकांमध्ये दोन्ही उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने मत दिले गेल्यामुळे त्या बाद ठरवण्यात आल्या होत्या. या 11 मतपत्रिकांची तपासणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हाधिकार्‍यांनी मतपत्रिका व मतमोजणी प्रक्रियेची चित्रफीत न्यायालयाला सादर केली. न्यायालयाने प्राधिकृत केलेले अधिकारी, याचिकाकर्ते, उमेदवार यांच्यासमक्ष बाद मतपत्रिकांची तपासणी करून निर्णय घेतला जाणार आहे.