आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विदिशा’ उत्सव शुक्रवारपासून, येणार नामवंत इंटेरियर डिझायनर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीय पातळीवरील अार्किटेक्ट्सची संस्था म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट अाॅफ इंटेरिअर डिझाइनर्सच्या नाशिक शाखेचा राैप्यमहाेत्सवी साेहळा साजरा हाेत अाहे. यानिमित्ताने ते ११ डिसेंबरपर्यंत ‘विदिशा’ उत्सवाचे अायाेजन शहरात करण्यात अाले अाहे. या महाेत्सवाला देशभरातील किमान ५०, तर शहरातील तीनशेच्या अासपास अार्किटेक्ट्स सहभागी हाेणार असून, नाशिककरांना अांतरराष्ट्रीय ख्यातीच्या डिझानर्सबराेबर संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे संस्थेचे नाशिकचे अध्यक्ष हेमंत दुगड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सेक्रेटरी तरन्नुम काद्री, माजी अध्यक्षा सुप्रिया नाथे, राखी टकले अाणि समीर बटाविया व्यासपीठावर हाेते.
नाशकात तीन दिवस चालणाऱ्या ‘विदिशा’ या उत्सवामध्ये डिझाइन्सच्या विविध पैलूंवर चर्चा हाेईल, तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात असणारे डिझाइनचे महत्त्व तसेच कथा, संवाद, सचिंतन, अनुनाद, राैप्य परिक्रमा प्रभातफेरी अशा विविध कार्यक्रमांतून हा उत्सव साजरा हाेणार अाहे.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव राष्ट्रीय सचिव अार्कि. जबिन झकारीस या देखील उपस्थित राहाणार अाहेत. या उत्सवाने नाशिककरांना अनेक बाबींचा उजाळा हाेणार असून, डिझाइनर्सचा शहर विकास साैंदर्यीकरणात कसा सहभाग असताे याचाही परिचय हाेईल, असे तरन्नुम काद्री यांनी सांगितले. या उत्सवाचा संकल्पना अार्किटेक्ट रितू शर्मा यांची असून, इनटॅक्टचे सहकार्य लाभत अाहे.
असे अाहेत ‘विदिशा’तील कार्यक्रम
९डिसेंबर - सायंकाळी५.३० वाजता गंगापूरराेडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे ‘कथा’ या नाशिक शहराच्या इतिहास सांस्कृतिक परंपरा दर्शविणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाटन . हे प्रदर्शन विक्री तीन दिवस चालेल.
९डिसेंबर- सायंकाळी ६वाजता हाॅटेल एमराल्ड पार्क येथे नाशिककरांना अांतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रीलंकेतील प्रसिद्ध अार्किटेक्ट पलिंगा कंनांग्रा बांगलादेशचे अार्किटेक्ट रफिक अाझम हे शाश्वत वास्तुकला या विषयांवर संवाद साधणार अाहेत.
१०डिसेंबर : सायंकाळी४.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे नाशिक ढाेल बाेहडा मिरवणुकीचे अायाेजन करण्यात अाले अाहे.
११डिसेंबर : प्रभात फेरीकाढली जाणार असून, जुन्या नाशिकमधील फुलबाजार, गाेदाघाट परिसरातील जुने वाडे, मंदिरे यांसारख्या पुरातन वास्तूंना भेट दिली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...