आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचा विदित गुजराथी बनला भारताचा चाैथा ‘सुपर ग्रँडमास्टर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्पेनमध्ये सुरू असलेल्या स्पॅनिश टीम अाॅनर स्पर्धेत अव्वल दर्जाच्या खेळाचा फाॅर्म कायम राखत विदित गुजराथीने ८.७ एलाे रेटिंगची कमाई केली. त्यामुळे त्याच्या २६९३ च्या एलाे रेटिंगमध्ये वाढ हाेऊन ते २७०१. वर पाेहाेचल्याने ताे अाता भारताचा चाैथा ‘सुपर ग्रँडमास्टर’ झाला अाहे. जगात त्याचे रेटिंग ४१ व्या स्थानावर पाेहाेचले असून जगातील पहिल्या ५० खेळाडूंमध्ये पाेहाेचणे हीदेखील बुद्धिबळ क्षेत्रातील वैश्विक स्तरावरची खूप माेठी कामगिरी मानली जाते. 

स्पॅनिश टीम अाॅनरमध्ये विदित हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत अाहे. ही लिग टुर्नामेंट असून प्रत्येक संघात खेळाडू खेळतात. या स्पर्धेत विदितने अातापर्यंत झालेल्या गेममध्ये एकही पराभव स्वीकारता गेममध्ये विजय अाणि गेममध्ये ड्राॅ करत ८.७ गुणांची कामगिरी केली. त्याच्या या अफलातून कामगिरीमुळे ताे अाता भारताचा चाैथा ‘सुपर ग्रँडमास्टर’ बनला अाहे. भारतात यापूर्वी केवळ विश्वनाथन अानंद, पी. हरिकृष्णा, शशिकिरण यांनाच इतकी उच्च कामगिरी करणे शक्य झाले अाहे. त्यातदेखील सध्या केवळ अानंद अाणि हरिकृष्णा यांचेच रेटिंग २७०० हून अधिक उरले असल्याने अाजघडीला तर विदित हा भारताचा केवळ तिसरा सुपर ग्रँडमास्टर अाहे. 

वर्षांतपूर्ण केले १०० एलाे रेटिंग
इंटरनॅशनलग्रँडमास्टर बनल्यानंतर विदितने वर्ल्ड चेस फेडरेशनच्या (फिडे ) मानांकनानुसार २०१४ मध्ये २६०० एलाे रेटिंग प्राप्त करीत माेठा टप्पा गाठला हाेता. त्यानंतर गत वर्षेदेखील सातत्याने अागेकूच करीत विदितने त्याच्या खेळाचा ठसा भारतासह विश्वातील नामवंत खेळाडूंसमाेरदेखील उमटवला हाेता. त्यापुढचा अत्यंत कठीण मानला जाणारा पुढील १०० एलाे रेटिंगचा टप्पा वर्षांत गाठला अाहे. त्याअाधी विदितने २५०० ते २६०० हा शंभर एलाे रेटिंगचा टप्पा अवघ्या वर्षभरात पूर्ण केला हाेता. दरम्यान, गत वर्षभरापासून विदित हा मूळ भारतीय वंशाचा डच बुद्धिबळपटू अनिश गिरी याच्यासमवेत प्रॅक्टिस पार्टनर म्हणून खेळत असल्यानेदेखील विदितला त्याचा चांगलाच लाभ हाेत अाहे. 

विदितची वाटचाल 
- २००९ मध्ये इंटरनॅशनल मास्टर (एलाेरेटिंग २४०० वर ) 
- २०१३ मध्ये इंटरनॅशनल ग्रँडमास्टर (एलाेरेटिंग २५०० वर ) 
- २०१७ मध्ये सुपर ग्रँडमास्टर (एलाे रेटिंग २७०० 

देदीप्यमान कामगिरी 
- ज्युनियर जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारा भारताचा एकमेव बुद्धिबळपटू 
- अांतरराष्ट्रीय ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारा महाराष्ट्राचा सगळ्यात लहान खेळाडू 
- साेळा वर्षांखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त विजेतेपद 
- एशियन ज्युनियर स्पर्धेतील संयुक्त विजेता 
- पॅरिस अाेपन बुद्धिबळ स्पर्धेत जगातील सर्वाेत्कृष्ट युवा बुद्धिबळपटूच्या पुरस्काराने सन्मान 

कर्तृत्वाचा माेठा अभिमान 
बुद्धिबळाचे काेणतेही बॅकग्राउंड नसताना विदितने स्वकर्तृत्वावर केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा मला अभिमान अाहे. जागतिक स्तरावर ताे ४१ व्या स्थानी पाेहाेचला. भारताला नवीन ग्रँडमास्टर तेदेखील नाशिक या शहरातून मिळू शकला. त्याचा अादर्श अनेक खेळाडू घेतील. 
- डाॅ. संताेष गुजराथी , विदितचे वडील 

मला प्रचंड अानंद 
चाैथाग्रँडमास्टरबनल्याने मला प्रचंड अानंद झाला. गत वर्षभरापासून मी माझे लक्ष या ‘मॅजिक फिगर’ वर केंद्रीत केले हाेते. ते गाठण्यात यशस्वी ठरल्याचा अानंद अवर्णनीय अाहे. अादर्श कास्पराेव्ह अानंदप्रमाणे अजून पुढचा टप्पा गाठायचा अाहे. 
- विदित गुजराथी, सुपर ग्रँडमास्टर 
बातम्या आणखी आहेत...