आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vijay Pandhare Committee On Irragation Scame Commission Chitale

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंचन घोटाळ्याची चौकशी करणा-या चितळे आयोगाला विजय पांढरे यांचे पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंचन घोटाळ्यावर आवाज उठवणारे ‘मेरी’चे अभियंता विजय पांढरे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व घोटाळ्याची चौकशी करणा-या चितळे आयोगाशी नव्याने पत्रव्यवहार केला आहे.

पांढरे यांच्या पत्रानंतरच सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आला. मात्र आयोगाकडून तपासात दिरंगाई होत असल्याने पांढरे यांनी पत्र पाठवले आहे. चितळे चांगले व्यक्ती आहेत. रामायणावर प्रवचने देतात. मात्र घोटाळ्याच्या चौकशीसाठी अधिकार नसल्याचे ते म्हणत आहेत. त्यामुळे पत्र पाठवले, असे पांढरे यांनी सांगितले. कार्यकक्षेसंबधी 33 अनियमिततांचा त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.