आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Pandhare News In Marathi, AAP, Ajit Pawar, Divya Marathi

पांढरेंकडून पुन्हा टार्गेट अजित पवार,‘आप’चा जाहीरनामा प्रकाशित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘मी दोषी असेल तर जेलमध्ये टाका’, हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान दांभिक असल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांनी आपला जाहिरनामा सादर केला. 12 प्रश्नांद्वारे पुन्हा सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या प्रलंबित चौकशीकडेही याद्वारे लक्ष वेधले.


जाहीरनामा प्रसिद्धीसाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पांढरे म्हणाले की, विदर्भातील दोन हजार 900 कोटी रुपयांच्या निविदा भ्रष्टाचारामुळे रद्द झाल्याने त्याची जबाबदारीही मंत्र्यांवरच येते. या व्यतिरिक्त 1500 कोटी रुपयांच्या वाढीव इस्टिमेटची रक्कमही अधिकार्‍यांकडून वसुलीचे आदेश दिल्यामुळे अपहारालाही ते दोषी आहेतच. विदर्भातील अनेक कामे सचिवांची स्वाक्षरी न करता अजित पवार यांनी कशी दिली, मेंढेगिरी, भाटीया समितीच्या अहवालातील दोषींवर कारवाई का झाली नाही, असे जवळपास 12 प्रश्न विचारून या प्रकारांना पवार हेच दोषी असल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही पांढरे यांनी केली.


बबन घोलपही रडारावर
‘आप’च्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचारावर कडाडून हल्ला चढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे आमदार बबन घोलप यांचे नाव अग्रभागी असून, शिवसेना आमदार-खासदार यांच्या पक्षांतरावरही टीका करण्यात आली आहे.


पांढरे यांचा ‘आम’ जाहीरनामा
* नाशिक शहरात मोनोरेल सुरू करणार.
* छोटे उड्डाणपूल व रिंगरोडचे नियोजन करणार.
* रोजगारासाठी आयटी पार्कचे विस्तारीकरण
* नाशिक-पुणे लोहमार्गाचा पाठपुरावा करणार.
* सुरत, डहाणू लोहमार्गासाठी प्रयत्न.
* कुंभमेळ्याचे नियोजन व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन.
* गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न सोडवणार.
* औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रकल्प
* सिव्हेज वॉटर ट्रिटमेंट प्लॅँट कार्यान्वित करणार.
* शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाधारित दरासाठी प्रयत्न