आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखाजोखा: भारताचा केवळ वर्षभरात जागतिक स्तरावर दबदबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विजया रहाटकर)
नाशिक- भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात राज्यात सर्वांगीण विकास साधत असून, त्याची प्रचिती वर्षभरात जनतेला आली आहे. वर्षभराच्या अगदी कमी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे यशस्वी करून जागतिक स्तरावर भारताची स्वतंत्र ओळख निर्माण करत दबदबा निर्माण केला असल्याचे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या ‘जनकल्याण पर्व’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेविका अलका आहेर, महिला आघाडी शहराध्यक्षा पुष्पा शर्मा, सरचिटणीस सुरेश पाटील, विजय साने, संभाजी मोरुस्कर, नगरसेवक दिनकर पाटील, सुनील बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रहाटकर म्हणाल्या की, मोदी सरकारची वर्षपूर्ती झाल्यानिमित्त देशभरात ‘जनकल्याण पर्व’ कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याद्वारे वर्षभरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जात आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारसमोर मोठी आव्हाने होती. ती सरकारने यशस्वीपणे पेलत देशभरात विकास कामे करण्याबरोबरच जनधन, पहेल, पंतप्रधान विमा योजना, सुकन्या यांसारख्या अभिनव योजना आणून त्यांचा लाभ थेट जनतेला मिळवून दिला आहे. ‘मेक इन इंडिया’च्या घोषणेनंतर अनेक परदेशी उद्योग भारतात येत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी उपलब्ध होत आहेत. देशातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हाती घेण्यात आला असून, त्यातून निर्माण होणारे कुशल मनुष्यबळ उद्योगांना मिळू लागले आहे. त्यामुळे उद्योगांची भरभराट होणार आहे.
सदस्य नोंदणीला प्रतिसाद
भाजपने शहरात अभिनव पद्धतीने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, नवीन अडीच लाख व्यक्तींनी भाजपचे सदस्यत्व मिळविले असल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्तविकात सांगितले. सावजी म्हणाले की, २०१५ हे आमचे संघटनपर्व आहे. त्याअंतर्गत सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यात महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. महापालिकेत ‘शंभर प्लस’ नगरसेवक पाठविण्याचेही उद्दिष्ट आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भ्रष्टाचार, घोटाळ्यांना ‘ब्रेक’...
बातम्या आणखी आहेत...