आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijayadasami Enthusiasm,latest News In Divya Marathi

विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथकांनी केले विभागनिहाय संचलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- संघकार्यराष्ट्रधर्म, दिव्य मार्ग चालता, पाऊले पुढे पुढे, मनात धन्य धन्यता.. पाऊलास पाऊले, सुरात सूर मिसळता, गळुनी अहंकार हो, संघभाव जागता, हात हाती घेऊनी, उठवू सर्वां चला, उषःकाल जाहला, नभी तुतारी फुंकता... या संघगीताच्या उत्साहभरल्या वातावरणात विजयादशमीनिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केले.
शहरातील सातही विभागातून हे संचलन झाले. ठिकठिकाणी शस्त्रपूजनही करण्यात अाले. संचलनाच्या अग्रभागी असलेल्या अश्वधारी भगवा झेंडा हाती घेतलेला स्वयंसेवक बाल स्वयंसेवकांच्या चित्तवेधक प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधले हाेते. पंचवटी विभागाच्या संचलनास सीबीएस येथील शिवाजी पुतळ्यापासून प्रारंभ झाला. ५२ तरूणांचे घोष पथक होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘एच. जोशी चे संचालक रघुभाई जोशी, मविप्र संस्थेचे सभापती विजयादशमीचा उत्साह विजयादशमीचा अ‍ॅड. नितीन ठाकरे, भाग संघचालक गोविंदराव यार्दी, भाग कार्यवाह अमोल काळे, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, रमेश गायधनी, प्रशांत गर्गे, घाेष प्रमुख मनाेज लाेणकर, बापू येवला अादी उपस्थित हाेते. इंदिरानगर भागातील मोदकेश्वरनगर परिसरात शस्त्र पूजनाचा कार्यक्रम झाला. अजय मित्र मंडळाच्या कार्यक्रमात तरुण बाल स्वयंसेवकांनी चित्तवेधक प्रात्यक्षिके सादर केली. प्रमुख पाहुणे भगवान माळी, श्री गुरुजी रुग्णालयाचे प्रकाश भिडे, शशिकांत पंडित, अजित ओढेकर, आशुतोष देशपांडे, पांडुरंग कदम, प्रा. पंकज नागमोती, तुषार मिसाळ आदी उपस्थित होते. सिडकोतील शालिनीताई बोरसे विद्यालयासमोरून संचलन झाले. नाशिकरोडला शहर संघचालक विजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले. आनंदऋषी हायस्कूल येथून संचलन सुरू झाले. संघाचे श्रावण सूर्यवंशी यांच्यासह कार्यवाहक संजय कीर्तने, नगरसेवक संभाजी माेरुस्कर, चंद्रभान बागडे, मंगेश कुलकर्णी, सुबोध कुलकर्णी, एकनाथ शेटे, सुहास पाठक, महेंद्र देसाई आदींसह १५० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
म्हसरूळ येथील संचलनाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार्यवाह सुबोध कुलकर्णी, कृष्णा घरोटे, विठ्ठल पवार, धनंजय बुवा उपस्थित हाेते तर सातपूर विभागात १३० स्वयंसेवक सहभागी झाले होते. अशोकनगर येथील नागरे चौकातून राधाकृष्णनगर, केदारनगर भागातून संचलन झाले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्तात्रय मोरे, सुधाकर भंदुरे, शशी घाटोळ, उदय कुलकर्णी, अंकुश बर्शिले, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते.
भोसला सैनिकी महाविद्यालयात शस्त्रपूजन
भोसलामिलिटरी स्कूलमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले. प्रगतीचे उच्च ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत, शिस्त, सातत्य हे गुण मिळवण्यासाठी पुढे जात राहिले पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उप-कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर यांनी केले. या प्रसंगी मध्यवर्ती हिंदू सैनिकी शैक्षणिक संस्थेचे डॉ. दिलीप बेलगावकर, प्रमोद कुलकर्णी, नारायण दीक्षित आदी उपस्थित होते.