आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikalp Trade Solutions Company Fraud Issue Nashik

विकल्प फसवणुकीतील संशयित अखेर शरण; दोन महिने दिला गुंगारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विकल्प ट्रेड सोल्यूशन कंपनीद्वारे शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींना गंडा घालणारे फरार तिघे संशयित सोमवारी अखेर पोलिसांसमोर शरण आले. या तिघांना पंचवटी पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कंपनीचे संचालक, निलंबित पोलिस संजय भालेराव, विजय निकम व पोलिस पुत्र संतोष आहेर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी दोन महिने पोलिसांना गुंगारा दिला होता. विकल्पद्वारे पोलिस कर्मचारी व व्यापारी, शेतकर्‍यांना गुंतवणुकीच्या रक्कमेवर दरमहा दहा ते बारा टक्के व्याज देण्याचे व वर्षभरात दामदुप्पटसारख्या योजनाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली होती. या कंपनीचे मुख्य संचालक मयांक नवीन ध्रुव यांच्यासह पाच जणांवर 20 नोव्हेंबर रोजी 20 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्हा दाखल करून सरकारवाडा पोलिसांनी ध्रुव व खैरनार यांना अटक केली होती. वरील संशयितांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. याबाबत ठेवीदार बचाव समितीने मोर्चा काढण्याचा इशारा नुकताच दिला होता.

मालमत्तेची विल्हेवाट लावल्यानंतर हजर
तपासी यंत्रणेकडून या गुन्ह्यात महाराष्ट्र गुंतवणूकार हितसंरक्षण कायदा लावण्यात आल्याने संचालकांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू होती. या काळात संशयितांनी कोट्यवधीची मालमत्ता नातलगांच्या नावे करून दिल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ते शरण आल्याने यामागे पोलिस दलातीलच त्यांचा मार्गदर्शक असल्याची चर्चा आहे.