आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच निवडही आता थेट निवडणुकीतून; ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमराणे - ज्यांना शेतकऱ्यांचे दुख कधी कळत नाही. जे कधी बाजार समितीत माल विकत नाही, असे लोक बाजार समितीत निवडून येतात. म्हणूनच सत्तेचे विकेंद्रीकरण करावे असा शासनाचा विचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून आणले पाहिजे. असेच सर्व ठिकाणी करण्याचा विचार आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतीतही लोकांची सुखदुखे जाणणारा सरपंच थेट निवडणुकीतून निवडण्याचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
 
उमराणे बाजार समितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.स्व. निवृत्तीकाका देवरे बाजार समिती आवारात शाॅपिंग सेंटर सभागृह, नवीन आवारात अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंतीचे भूमिपूजन शेतकरी मेळावा झाला.अध्यक्षस्थानी आमदार डाॅ. राहुल आहेर होते. प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांनी केले. आमदार डाॅ. आहेर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीत मोठे बदल केले आहे. आडत बंद केली आहे‌. सहकाराला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमदार निधीतून गावांमध्ये जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न असेल.
 
सभापती विलासकाका देवरे यांनी संयोजन केले. अाभार राजेंद्र देवरे यांनी मानले. यावेळी उपसभापती विजया खैरनार, संचालक राजेंद्र देवरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडूकाका देवरे, सरपंच सोनाली देवरे, जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, जिल्हा उपनिबंधक निळकंट करे, सहायक निबंधक संजय गिते, बाळासाहेब आहेर, शिवाजी ठाकरे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...