आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी गटनेतेपदी विनायक खैरे

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या 20 व जनराज्य आघाडीच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी दुपारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली. विभागीय आयुक्त जयंत गायकवाड यांच्या गैरहजेरीत प्रशासन उपायुक्त व्ही. टी. जरे यांनी सदस्यांची ओळखपरेड करून नोंदणी केली. राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ सदस्य विनायक खैरे, तर जनराज्य आघाडीतर्फे अपूर्व हिरे यांची गटनेतेपदी नोंदणी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये 12 महिला, तर आठ पुरुषांचा समावेश आहे.
भाजपची नोंदणी आज : महापालिकेत विजयी झालेल्या पक्षांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनराज्य आघाडीच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे सदस्यांची कायदेशीर नोंदणी केली आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय व कॉँग्रेस सदस्यांची नोंदणी अद्याप करण्यात आलेली नाही. भाजप सदस्यांची नोंदणी शनिवारी (दि. 25) करण्यात येणार असल्याची माहिती शहर सरचिटणीस सुनील आडके यांनी दिली. आरपीआयचे शहराध्यक्ष व नवनिर्वाचित सदस्य सुनील वाघ यांनी उपायुक्त जरे यांची भेट घेऊन नोंदणीची प्रक्रिया समजून घेतली. पक्षाध्यक्ष रामदास आठवले शनिवारी नाशकात येण्याची शक्यता आहे. सदस्यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीत ते गटनेत्याचे नाव जाहीर करतील. त्यानंतर सदस्यांची नोंदणी करण्यात येईल, असे वाघ यांनी या वेळी सांगितले.