आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशभरातीलविविध ठिकाणच्या कुंभमेळ्यांप्रमाणे नाशिकचा कुंभमेळाही जगप्रसिद्ध व्हावा, यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आल्यास कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली. केंद्राकडून कुंभमेळ्यासाठी भरघोस निधी देण्याची आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
तपोवनातील साधुग्रामसह विविध विकासकामांचा प्रारंभ शुक्रवारी तावडे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार गिरीश महाजन, महापौर यतिन वाघ, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह महंत संविदानंद सरस्वती, रामस्नेहीदास महाराज यांच्यासह साधू-महंत उपस्थित होते. विधानसभेसाठीचा राजकीय आखाडा सुरू झाला असून, सर्व इच्छुक आपापल्या परीने तयारीत आहेत, असे सांगून आगामी राजकीय चुरशीचे संकेतही त्यांनी दिले. गिरीश महाजन म्हणाले, १६३ एकरांत साधुग्राम साकारत असून, १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एवढा निधी २० वर्षे आमदार राहूनदेखील मिळाला नाही. महापौर वाघ यांनी आयुक्तांविना कामे रखडल्याचे सांगून, केंद्राकडे सिंहस्थासाठी भरघोस निधी देण्यासाठी मागणी करावी, अशी मागणी केली. व्यासपीठावर उपमहापौर सतीश कुलकर्णी, अजय बोरस्ते, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी मान्यवर होते. बाळासाहेब सानप, ज्योती गांगुर्डे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सोमनाथ बोडके यांनी सूत्रसंचालन केले. दिगंबर धुमाळ यांनी आभार मानले. विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते तावडे. समवेत आमदार गि रीश महाजन, महापौर यतिन वाघ, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आदी.