आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ वाहनांच्या दर्शनाने ‘त्या’ काळाचा भास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुणी पुढचे हॅण्डल फिरवून आपली दिमाखदार, छोटेखानी कार चालू करीत होते, तर कुणी गर्द पिवळ्या रंगाच्या चारचाकीतून दिमाखात एंट्री घेत होते. कुणी बॉबीला किक मारत गोल चक्कर मारीत होते तर कुणी वेस्पावरून सफर करीत होते. निमित्त होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित हेरिटेज व्हेइकल्स रॅलीचे.

हेरिटेज व्हेइकल्स ऑनर्स क्लब या नाशिकच्या संघटनेच्या वतीने 1920 ते 1980च्या काळातल्या दुर्मिळ वाहनांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. सोमेश्वर लॉन्सवरून गंगापूर रोड, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड, सातपूर, सिटी सेंटर मॉल आणि पुन्हा सोमेश्वर लॉन्स अशा या रॅलीमध्ये सुमारे 40 चारचाकी आणि 35 दुचाकी वाहने व स्कूटर्स सहभागी झाल्या होत्या. नाशिक, पुणे, ठाणे येथून ही वाहने आली होती. सोमेश्वर लॉन्स येथे ही दुर्मिळ वाहने पाहण्याचा आनंद अनेक नाशिककरांनी लुटला. रॅलीदरम्यान ठाणे, पुणे आणि नाशिकच्या ग्रुप्सचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कुणाचे वाहन 1933 चे, तर कुणाचे 1942 मधील. इतकी जुनी वैविध्यपूर्ण वाहने पाहताना लहान मुलेदेखील हरखून जात होती. विनयकुमार चुंबळे, अमोल जोशी आदींनी रॅलीच्या आयोजनाचे काम पाहिले. रहदारीचे थोडे विस्कटलेले नियोजन वगळता रॅली सुरळीत झाली.

मुंबई-ठाण्यातील पारशी कुटुंबांचा सहभाग

हाजी मिठाई ग्रुपबरोबर मुंबई-ठाण्याचे पारशी कुटुंबीय या रॅलीत सहभागी होते. बॉबी म्हणजे राजदूत ही टू-व्हीलरचे तरुणांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली. बॉबी चित्रपटात तिचा वापर झाल्याने तिचे हे नामकरण झाले आहे.

या वाहनांचा होता सहभाग
नाशिक : हाजी मिठाई ग्रुप या रॅलीत सहभागी होता.

चारचाकी वाहने : ऑस्टिन 7 - 1931, 1933, 1935 आणि बेबी ऑस्टिन या पुढचे हॅण्डल फिरवून सुरू कराव्या लागणार्‍या गाड्या लक्ष वेधून घेत होत्या. याव्यतिरिक्त बिटल्स, स्टॅण्डर्ड 2000, ट्रॅम, मॉर्टन, बीएसए, फोर्ड प्रीफेक, विलीज्.

स्कूटर : लॅम्रेट, बॉबी (राजदूत)

दुचाकी : ए. डी. टॉग्ज, मॅचलस, ए.जी.एस.

ठाणे : स्कूटर : वेस्पा, विन्टोसिटी, स्टॅण्डर्ड हेराल्ड

मुंबई : चारचाकी : पेकार्ड, ब्यूक मिनी, इटालियन फियाट, र्मसिडीज कन्व्हर्टेबल, फोक्सवॅगन बिटल

पुणे : टायगर ट्रॅम, रॉयल एमफिल -1932.

टू -व्हीलर : रॉयल इनफिल्ड

एकूण चारचाकी : 40

टू व्हीलर्स व स्कूटर्स : 35