आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Violence Attack On Auto Rickshaw Driver In Nashik

रिक्षाचालकावर हप्ता दिल्याने जीवघेणा हल्ला, अतिरक्तस्रावामुळे गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी समाधान पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
जखमी समाधान पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिक - रिक्षा थांब्यांवरील संघटनेचा फलक काढल्याच्या आरोपावरून आणि हप्ता दिल्याने तीन ते चार संशयितांनी पपया नर्सरीजवळ एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. ६) संध्याकाळी घडली. गेल्या काही दिवसांपासून संशयिताविरुद्ध स्थानिक रिक्षाचालक वारंवार तक्रार करत असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे रिक्षाचालकाडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दोन संशयित फरार आहेत.

या हल्ल्यात समाधान सीताराम पाटील (२७, रा. अशोकनगर, मूळ रा. विखरण (नंदुरबार) हा गंभीर जखमी झाला आहे. वारंवार तक्रारीनंतर या प्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे निर्ढावलेल्या संशयितांनी पाटील यास धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केले असून, त्यांस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

पाटील हा पायी जात असताना तीन ते चार अज्ञातांनी गाठून ‘हप्ता का देत नाही आणि फलक का काढला’ अशी कुरापत काढून धारदार शस्त्रांनी ८-९ वार केले. अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढे त्यास रात्री खासगी रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त वाडेकर, पोलिस निरीक्षक मनोज करंजे आदींनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. याप्रकरणी सातपूर गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी शाम सिद्धपुरे, व्ही. कोल्हे, दत्ता खैरे यांनी तपास करून संशयित सोनवणे यास ताब्यात घेतले असून दोघे फरार आहेत.

खंडणीसाठी दबाव
चंद्रकांत आणि रवी वाघमारे त्यांच्या साथीदार चार महिन्यांपासून हप्ता मागत होते. त्यास विरोध केल्याने संशयित वाघमारेसह साथीदारांनी रिक्षाचालकांना गोल्फ क्लब मैदानावर बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी रिक्षाचालकांनी वाघमारेविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली असता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून कारवाईस टाळाटाळ केली. त्यानंतर संशयित पुन्हा रिक्षाचालकांवर हप्ता देण्यासाठी दबाव टाकत होते, असे ठक्कर बाजार भागातील रिक्षाचालक सांगतात.
या प्राणघातक हल्ल्यामागे काय आहे प्रकरण
संशयितचंद्रकांत आणि रवी वाघमारे दोघे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत गेले. त्यामुळे रिक्षाचालकांनी वाघमारे याच्या संघटनेचा फलक काढून तेथे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या संघटनेचा फलक लावला होता. त्यामुळे वाघमारे याचे साथीदार संतोष सोनवणे, अक्षय प्रकाश शिंदे, गणेश झाल्टे आदींनी रिक्षाचालकांना धमकावू लागले होते. ‘फलक का काढला?’ अशी कुरापत काढून जानेवारीस सादीक पिंजारीस बेदम मारहाण करीत शब्बीर पठाण याच्या हातास चावा घेतला होता. याप्रकरणीही पुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी (दि. ६) रिक्षाचालक संशयितांमधील वाद मिटवला होता. मात्र, संशयित संतोष सोनवणे, अक्षय, प्रकाश जाधव आदींनी पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
पुढे वाचा.. वादामुळेच हल्ला