आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीआयपी कामगारांचे राज ठाकरेंना साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- व्हीआयपी कामगारांनी निवृत्तीच्या प्रश्नावर राज ठाकरे यांना साकडे घातले. निवृत्तीचे वय 60 वरून 58 व नंतर 2004 मध्ये 56 वर्षे करण्यात आले आहे. या संदर्भात ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली.

कंपनी मालक दिलीप पिरॅमल यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन राज यांनी दिले. या प्रसंगी आमदार वसंत गिते, आमदार नितीन भोसले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, महापौर यतिन वाघ, कामगार अरुण ठाकूर, दिवाकर काजळे, अंबादास आवारे, सोपान खरे, आधार पगार, अशोक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.