आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामजन्मभूमीत लवकरच होणार मंदिर : सांवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- श्रीरामाचा जन्म हा अयाेध्येतच झाला अाहे. राजकीय परिवर्तनामुळे विखुरलेला हिंदू पुन्हा एकदा एकवटला असून, अयाेध्येत अाता राममंदिर हाेणारच, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सांवला यांनी केला. गंगाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर सुवर्णमहाेत्सव जयंतीनिमित्त अायाेजित विश्व िहंदू संमेलनात सांवला बाेलत हाेते.
तत्पूर्वी गाेपूजनाने संमेलनाचे उद‌्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष एकनाथ शेटे, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी परिपूर्णानंदजी महाराज, त्र्यंबकेश्वर अानंद अाखाड्याचे स्वामी सागरानंदजी सरस्वती, िहंदू एकताचे अध्यक्ष रामसिंग बावरी उपस्थित हाेते.
सांवला म्हणाले की, अयाेध्या, काशी हे शाश्वत सत्य असून, त्याला काेणीही नष्ट करू शकत नाही. इतर देशांच्या सीमा मानवनिर्मित अाहेत. मात्र, भारताच्या सीमा परमेश्वराने बनविल्या अाहेत. संपूर्ण िहंदू एकवटला असून, देशाच्या सीमा काेणीही ताेडू शकणार नाही. काेणी ताेडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला विश्व हिंदू परिषद चाेख प्रत्युत्तर देईल. इतर जातीयवादी प्रेमाच्या नावाखाली िहंदू तरुणींशी विवाह करून जात वाढविण्याचा प्रयत्न करत अाहे.
त्यामुळे िहंदू तरुणींनी सावध राहण्याची गरज अाहे. अातापर्यंत ६१ लाख मुस्लिमांना हिंदू बनविण्यात अाले अाहे. सशक्त िहंदू हीच देशाची अाेळख असून, काही जण देश ताेडू पाहत अाहे. िहंदू एकत्र अाले नाही, तर देशाची फाळणी हाेईल. त्यासाठी संघटित व्हावे, असे अावाहन त्यांनी केले. प्रास्ताविक संमेलनाचे संयाेजक गणेश सपकाळ, तर सूत्रसंचालन सहसंयाेजिका अॅड. मीनल भाेसले यांनी केले.
कठाेर शासन व्हावे
केंद्रातअाता भारतीय जनता पक्षाचे सरकार अाहे. गत काही वर्षांत गाेहत्येचे प्रमाण वाढले अाहे. कत्तलखाने खुलेअाम चालविले जात अाहे. त्यामुळे गाेहत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची िशक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी शासनाने तसा कायदा करावा, अशी मागणी करण्यात अाली.
गाेरक्षक प्रमुख नेमणार
विश्विहंदू परिषदेने अातापर्यंत २७ लाख गायींची सुटका केली अाहे. गाेमातेच्या रक्षणाची माेहीम अागामी काळात अाणखीनच तीव्र करणार असून, त्यासाठी देशभरात १.२५ काेटी गाेरक्षक प्रमुख नेमण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात अाले अाहे.

यशवंतराव महाराज पटांगण :
विश्वहिंदू परिषद नाशिक आयोजित विशाल हिंदू संमेलनाअगाेदर गोमातेचे पूजन करताना विहिंपचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सांवला. समवेत प्रांत अध्यक्ष एकनाथराव शेटे, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी परिपूर्णानंदजी महाराज आदी.