आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्मामध्ये विज्ञान विवेकानंदांनी समजावले; वसंत व्याख्यानमालेत डाॅ. मिश्रा यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक: विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत, एक घटक प्रयोगशील आहे तर एक अनुभवातून सिद्ध होतो. हीच गोष्ट विवेकानंदांनी लोकांना समजावली. प्रत्येक अध्यात्मामध्ये विज्ञान आहे, विज्ञान साध्य करण्यासाठी विश्वासाची गरज असते आणि विश्वास अध्यात्माशी जोडलेला आहे असे मत विवेकानंदांचे होते, अशी माहिती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी दिली. 
 
नाशिकच्या श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी गोदातीरावर आयोजित वसंत व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प अध्यात्माला आणि विज्ञानाला समर्पक होते. दि. ११ मे रोजी सायंकाळी ‘स्वामी विवेकानंद अध्यात्म आणि विज्ञान’ या विषयावरील हा कार्यक्रम बाबूराव हाके यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंदांनी वेदांच्या विज्ञानाचे प्रमाण दिले, श्रीमद‌्भगवद‌्गीता हे विज्ञानाचे चालते बोलते प्रारूप आहे. हे दाखवून देण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी वेदांची प्रमेयाच्या स्वरूपात मांडले. स्वामी विवेकानंदांनी फक्त भगवी वस्त्रे परिधान केली नाहीत, त्यांनी विज्ञानात इतिहास रचला. विज्ञान आणि अध्यात्माचा अंतिम टप्पा सारखा आहे. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म तयार झाले आहे. त्यांचे मार्ग वेगळे असले तरी त्यांचा उद्देश सारखाच आहे. विज्ञान हे ‘एक्सपेरिमेंटल’ आहे तर अध्यात्म हे ‘एक्सपिरिएंशियल’ आहे, ही विचार पद्धत त्यांची होती. स्वामी विवेकानंद यांच्या मते अनुभवदेखील प्रमाण आहे. याचबरोबर ईश्वरप्राप्तीसाठी विज्ञान, लोकांच्या निर्वाहासाठी अध्यात्म आणि स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञानातील सिद्धांताचे आधार या विषयांचे विश्लेषण केले. 
बातम्या आणखी आहेत...