आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत मोर्चाला हिंसक वळण, ताेडफाेडीविराेधात सर्वपक्षीयांचे अांदाेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - नगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा, जवखडे, जवळा आणि शिर्डीतील दलित हत्याकांडाच्या निषेर्धात शिर्डीत गुरुवारी दलित संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र संतप्त माेर्चेकऱ्यांनी दिसेल त्या दुकानावर दगडफेक केल्याने अांदाेलनाला हिंसक वळण लागले. त्याविराेधात ग्रामस्थांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निषेध केला. तसेच ताेडफाेड करणाऱ्यांवर कठाेर कारवाईची मागणी केली.

नगर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांडांच्या निषेधार्थ राज्यातील दलित संघटनांच्या सर्व गटांनी हा आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात राज्यभरातून दहा हजारांवर कार्यकर्ते सहभागी झाले होत या मोर्चाचे नेतृत्व मनोज संसारे, कवी आनंद शिंदे, नानासाहेब इंदिसे, सुनील खोब्रागडे, तानसेन नलावडे, किशोर भाटे यांनी केले.
दुपारी एकच्या दरम्यान मोर्चा छत्रपती व्यापारी संकुलाच्या प्रांगणात येताच आंदोलनकांनी तोडफोड कऱण्यास सुरुवात केली. तीन हाॅटेलांचे मोठे नुकसान झाले. तीन दुकानांची तोडफोड झाली. त्यात एक महिला गंभीर जखमी झाली. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तोडफोडीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा
दलित संघटनांच्या मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांकडून हाॅटेल्स व दुकानांची तोडफोड केल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व पाच ते सहा हजार नागरिकांनी पोलिस स्टेशन भव्य माेर्चा नेला. शिर्डीतील शांतता भंग व तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या मोर्चाच्या संयोजकांसह समाजकंटकांवर दरोडा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. साईनाथ विद्यालयाच्या प्रांगणात सर्वपक्षीय जमाव जमा झाला हाेता. यात माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगरसेवक अभय शेळके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कोते, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक शिवाजी गोंदकर अादींचा समावेश हाेता. दरम्यान, शिर्डीतील सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यावर कोणतेही कारवाई अथवा बदली होता कामा नये, तसेच पाकिटमारांवर त्वरित कारवाईस सुरुवात करावी, अशी मागणीही करण्यात अाली.