आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मतदार नोंदणी हा तर आमचा हक्कच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मतदार यादीत नाव नोंदविणे आणि मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्यच आहे. ही जबाबदारी ओळखत क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी महाविद्यालयातच उपलब्ध असलेल्या सुविधेचा लाभ घेतला.

निवडणूक किंवा मतदार प्रक्रियेपासून काहीसे अलिप्त राहात असलेल्या युवा मतदारांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने सुरू केलेल्या ‘वोट फॉर बेटर इंडिया’ आणि ‘दैनिक दिव्य मराठी’ने त्यास सहकार्य करत ‘बना मतदार’ हे मतदार नोंदणी अभियान महाविद्यालयांमध्ये राबविले जात आहे. बुधवारच्या तिसर्‍या दिवशी क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी 12 वाजेपासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अर्ज वितरणाची सुविधा असल्याने आलेला प्रत्येक विद्यार्थी कुतुहलाने नेमके काय चालले आहे याची विचारपूस करत होता. मीही 20 वर्षांचा झालो आहे. परंतु, अद्याप मतदार यादीत नावच नोंदविले नसल्याचे सांगत मला नोंदविता येईल ना? असे प्रश्न विचारत स्वयंसेवकांकडून समाधान होताच अर्ज घेऊन तत्काळ भरून देण्याचे आश्वासनही देत होते.

विद्यार्थी सभेचे सदस्य, प्राध्यापक यांनी थेट विद्यार्थ्यांना नाव नोंदविण्यासाठी वर्गात जाऊन माहिती देत तत्काळ अर्ज भरण्यासाठी आवाहन केले. जयकुमार कोळी, सूरज मोकळ, हितेश चौधरी, राहुल पाटील, मंदार ठाकूर, पंकज जाधव, केशव गवळी अनिष मसराणी यांनी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे समाधान करत त्याला अर्ज वितरित करण्यासाठी पर्शिम घेतले.

नागरिकांनाही आवाहन
रहिवासी सोसायटीतील ज्या नागरिकांनीही आपले नाव नोंदविले नाही, अशांनी जवळच्या मतदान नोंदणी केंद्राशी संपर्क साधावा. तसेच ज्या सोसायट्यांमधील रहिवाशांना एकत्रितरित्या मतदार नोंदणीबाबत माहिती हवी असेल त्यांनी 9822111999, 9096928180, 8390905716, 8390905725 या क्रमांकावर संपर्क साधावा.

इतर शाखांमध्येही उपक्रम
महाविद्यालयाच्या विद्यार्थी सभेच्या सभासदांबरोबरच प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारीही ज्यांनी नाव नोंदविले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी प्रबोधन करतील. संस्थेच्या कृषी आणि पॉलिटेक्निक या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही याची माहिती दिली जाईल. या प्रबोधनातून तरुणाईच्या पुढाकाराला चालना मिळू शकेल. अजिंक्य बाळासाहेब वाघ

सुशिक्षित उमेदवार मिळेल
या मोहिमेंतर्गत सर्वच सुशिक्षित आणि उच्च् विद्याविभूषित मतदारांची नोंदणी होणार आहे. त्यामुळे सुदृढ लोकशाहीसाठी या मोहीमेचा फायदा हा दूरगामी असेल. त्यातून चांगला आणि सुशिक्षित उमेदवारच निवडून दिला जाईल. त्यामुळे राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण आपोआपच थांबण्यास मदत होईल. डॉ. व्ही. एम. शेवळीकर, प्राध्यापक

सुविधेमुळे प्रतिसाद
बर्‍याचदा मतदार यादीत नाव नोंदविण्याचा विचार केला होता. मात्र, ती नेमकी कुठे केली जाते हेच माहिती नव्हते. मतदार नोंदणीची सुविधा महाविद्यालयातच उपलब्ध झाल्याने खूप आनंद झाला. या नोंदणीने मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. नेहा कोथमिरे, विद्यार्थिनी