आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑन दी स्पॉट’ नोंदणीमुळे उत्साह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘दिव्य मराठी’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या नवमतदार नोंदणी अभियानाच्या तिसर्‍या दिवशी गुरुवारी के. के. वाघ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती प्रत्यक्षात अर्जच भरून घेण्यात आले. या ‘ऑन दी स्पॉट’ नोंदणीमुळे नवमतदारांत उत्साह दिसून आला. कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे सोबत आणण्यासाठी सांगण्यात आले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक राहुल पाटील यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना माहिती दिली. विद्यार्थी प्रतिनिधींनी स्वत:चे नाव तत्काळ नोंदवत विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य डॉ. व्ही. शेवळीकर यांनी मताचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थी प्रतिनिधींनी थेट आपापल्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना या अभियानाविषयी माहिती दिली. एकूण विद्यार्थी, त्यातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या आणि अद्याप मतदारयादीत नाव न नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित करीत तशी यादीच तयार केली. त्यानुसार अर्जांचे गुरुवारी वितरण करीत शुक्रवारी ते तत्काळ भरूनही घेतले जाणार आहेत.

तिसर्‍या दिवशी 175 अर्ज जमा
वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात 100 आणि ‘मविप्र’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 75 असे एकूण 175 अर्ज जमा झाले. महाविद्यालयात विविध र्जनल्स आणि प्रात्यक्षिके जमा करण्याची गुरुवार ही अंतिम मुदत असल्याने शुक्रवारपासून मोठय़ा संख्येने अर्ज जमा होण्याची शक्यता आहे.

‘ड्रीम सिटी’मध्ये आज बैठक
मतदार नोंदणी अभियानासाठी ‘दिव्य मराठी’ने सोसायट्यांना केलेल्या आवाहनाला पहिला प्रतिसाद ‘ड्रीम सिटी’ येथील रहिवाशांनी दिला. त्यानुसार येथे शुक्रवारी रात्री 8ला विशेष बैठक होणार असून, त्यात मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.